Tax Saving Scheme: सरकारनं दिल मोठं गिफ्ट! 'या' योजनेतून मिळणार तीन फायदे, गुंतवणुकीसोबत टॅक्सही वाचणार

Tax Saving Scheme: सरकारकडून वेळोवेळी अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जातात. यातच, पीपीएफ योजना ही अशी योजना आहे जी गुंतवणूकदारांना तीन प्रकारचे लाभ देते.
Money
Money Dainik Gomantak

Tax Saving Scheme: सरकारकडून वेळोवेळी अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जातात. यातच, पीपीएफ योजना ही अशी योजना आहे जी गुंतवणूकदारांना तीन प्रकारचे लाभ देते. गुंतवणूकदारांनाही त्याचा मोठा फायदा होतो.

ही योजना आयकराच्या कलम 80C अंतर्गत येते, त्यामुळे PPF खात्यात गुंतवलेले पैसे करमुक्त आहेत. PPF खात्याचे अनेक फायदे आहेत, ज्याबद्दल आज आपण समजून घेणार आहोत...

दरम्यान, केंद्र सरकारकडून अनेक प्रकारच्या योजना राबवण्यात येत आहेत. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) देखील या योजनांमध्ये समाविष्ट आहे. पब्लिक प्रॉव्हिडंट फंड ही भारत सरकारची अशी गुंतवणूक योजना आहे, जी चांगला व्याजदर देते.

ही भारतातील (India) सर्वात सुरक्षित आणि सामान्य गुंतवणूक योजनांपैकी एक आहे. कारण ती एका विशिष्ट कालावधीत गुंतवलेल्या रकमेवर खात्रीशीर परताव्याची हमी देते.

Money
Small Savings Schemes: सुकन्या समृद्धी-पीपीएफचे सरकारने बदलले नियम, अर्थमंत्र्यांचा आदेश जारी

टॅक्स बेनेफिट- कर वाचवणे हा पीपीएफ खात्याच्या प्राथमिक फायद्यांपैकी एक आहे. ते पूर्णपणे करमुक्त आहे. PPF खात्याच्या कर फायद्यांमध्ये आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर कपात समाविष्ट आहे. गॅरंटेड रिटर्न्स ऑफर करण्याव्यतिरिक्त, गुंतवणुकीच्या संपूर्ण मूल्यावर सूट आहे, ज्यामुळे ती टॅक्स-कुशल गुंतवणूक बनते.

गुंतवणूक- पीपीएफ योजना गुंतवणुकीच्या दृष्टीनेही चांगली योजना आहे. ही योजना दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करण्याची सुविधा प्रदान करते. या योजनेत 15 वर्षांचा लॉक-इन आहे आणि मॅच्युरिटी रक्कम 15 वर्षांनंतरच मिळते. अशा परिस्थितीत या योजनेतर्गंत दिर्घकालीन गुंतवणूक करता येते.

Money
Small Savings Schemes Rules: PPF-सुकन्या समृद्धीच्या नियमात मोठा बदल, अर्थमंत्र्यांनी जारी केला आदेश

बचत- दुसरीकडे, पीपीएफ योजना बचत करण्याची संधी देते. या योजनेत खातेदार एका आर्थिक वर्षात किमान 500 रुपये बचत म्हणून ठेवू शकतात. त्याचवेळी, जास्तीत जास्त एका आर्थिक वर्षात, गुंतवणूकदार या खात्यात 1.5 लाख रुपयांपर्यंत बचत करु शकतो. ज्यावर सध्या 7.1 टक्के व्याज दिले जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com