Housing Prices: घरांच्या वाढत्या किंमतीत जगात मुंबईची मोठी झेप; 95 व्या स्थानावरून थेट 19 व्या स्थानी उडी...

बंगळूरू जगात 22 व्या स्थानी
Housing Prices
Housing PricesDainik Gomantak

House Prices: जगभरातील रियल इस्टेट क्षेत्राचा अभ्यास करता एप्रिल-जून या तिमाहीत घरांच्या किमतींमध्ये झालेल्या वाढीच्या बाबतीत देशाची आर्थिक राजधानी मुंबई आघाडीवर आहे.

जागतिक स्तरावर मुंबई घरांच्या वाढत्या किंमतीत 19 व्या स्थानी आहे तर बंगळुरू 22 व्या क्रमांकावर आहे. नाइट फ्रँक इंडियाने शुक्रवारी एका अहवालातून ही माहिती दिली. गेल्या वर्षी याच कालावधीत मुंबई 95 व्या तर बगळुरू शहर 77 व्या क्रमांकावर होते.

रिअल इस्टेट क्षेत्राविषयी सल्लागार असलेल्या नाइट फ्रँक इंडियाने एप्रिल-जून 2023 तिमाहीसाठी ग्लोबल रेसिडेन्शियल सिटीज इंडेक्स जारी करताना ही माहिती दिली.

त्यानुसार, जगातील 107 शहरांमध्ये सामूहिक पातळीवर सरासरी किमतीत 1.7 टक्के वाढ झाली होती, तर वर्षभरापूर्वी याच तिमाहीत सरासरी किमती 11.7 टक्क्यांनी वाढल्या होत्या.

Housing Prices
गोव्यातील INEX 2023 प्रदर्शनात 150 हून अधिक इनोव्हेशन्स; जगभरातील नवसंशोधक होणार सहभागी

या अहवालानुसार, जून तिमाहीत मुंबईतील घरांच्या किमतीत सहा टक्के वाढ झाली आणि जागतिक निर्देशांकात ती 76 स्थानांनी वाढून 19 व्या स्थानावर पोहोचली. तर बंगळुरू शहर या निर्देशांकात 5.3 टक्क्यांच्या वाढीसह 22 व्या स्थानावर पोहोचले आहे.

2023 च्या दुसऱ्या तिमाहीत, दिल्लीतील निवासी किमती वार्षिक आधारावर 4.5 टक्क्यांनी वाढल्या आणि भारतीय शहरांमध्ये तिसरे स्थान आणि जागतिक स्तरावर 25 व्या स्थानावर पोहोचले. वर्षभरापूर्वी दिल्ली या यादीत 90 व्या स्थानावर होती.

त्याचप्रमाणे, चेन्नई आणि कोलकाता निवासी मालमत्ता वर्गात अनुक्रमे 39 व्या आणि 40 व्या स्थानावर आहेत आणि 2.5 टक्क्यांच्या समान किंमतीत वाढ झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत चेन्नई 107 व्या तर कोलकाता 114 व्या क्रमांकावर होते.

Housing Prices
37th National Games Goa: क्रीडा मंत्री गोविंद गावडे म्हणाले, मुलगीही स्पर्धेत खेळतीय... पण तिला 'चीअर' करणार नाही!

तुर्कस्तानची राजधानी अंकारा येथे जागतिक स्तरावर सर्वाधिक किमतीत 105.9 टक्के वाढ झाली आणि हे शहर यादीत पहिल्या स्थानावर पोहोचले. तुर्कीतील दुसरे शहर इस्तंबूल 85.1 टक्क्यांच्या वाढीसह दुसऱ्या स्थानावर आहे.

नाइट फ्रँकच्या यादीत स्वीडनची राजधानी स्टॉकहोम सर्वात खालच्या क्रमांकावर आहे. घरांच्या किमतीत 14.3 टक्के घट झाली आहे.

नाइट फ्रँक इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शिशिर बैजल म्हणाले, 2022 च्या सुरुवातीपासून, मजबूत मागणीमुळे निवासी किमती चांगल्या वेगाने वाढल्या आहेत. व्याजदरात वाढ होऊनही ग्राहकांच्या सततच्या विश्वासामुळे घरांची विक्री वाढत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com