ChatGPT आता फोनमध्ये करता येणार डाउनलोड

ChatGPT हे AI टेक्नॉलॉजीद्वारे चालवले जाणारे एक साधन आहे. चॅटबॉटसह तुम्हाला संभाषण आणि बरेच काही करण्याची सुविधा मिळते.
Chat GPT
Chat GPT Dainik Gomantak

Chat GPT:  चॅट जीपीटीचा वापर सध्या जगभरात सुरु आहे. याबाबत नवनवे अपडेट देखील समोर येत आहेत. त्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI चा वापर करण्यात येणार आहे. ही सुविधा आता अमेरिकेतील आयफोन यूजर्सना उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. अमेरिकेनंतर ही सुविधा भारतातील (India) ग्राहकांसाठीही सुरू करण्यात येणार आहे.

चॅट जीपीटी भविष्यासाठी चांगला मानला जातो. याचे अनेक फायदे लोकांना होवू शकतात. AI ChatGPT ची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे. एकीकडे हे अॅप खूप लोकप्रिय होत आहे तर दुसरीकडे याच्या आयफोन यूजर्सची संख्या वाढत आहे.

ChatGPT मध्ये असणाऱ्या काही विशिष्ट कारणांमुळे हे लोकांच्या पसंतीस पडत आहे.  MacRumors च्या रिपोर्टनुसार हे अॅप आणखीन आकर्षित होत असून यूजर्सची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पण हे ChatGPT आता आयफोन वापरकर्त्यांसाठी प्ले स्टोअरवर लाँच करण्यात आले आहे. ज्याचा फायदा युजर्संना मोठ्या प्रमाणात होवू शकतो. फक्त ज्या लोकांकडे आयफोन आहेत तेच लोक  ChatGPT चा वापर करु शकणार आहेत.

Chat GPT
Goa Petrol-Diesel Price: गोव्यातील इंधनाच्या दरात किरकोळ बदल; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलच्या किमती

या अॅपचा वापर युजर्सला कोणतेही शुल्क मोजावे लागणार नाही. तुम्हाला हवी असणारी प्रत्येक गोष्ट तुम्ही या अॅपवर सर्च करू शकता आणि त्याचे उत्तर तुम्हाला अगदी काही सेकंदात मिळू शकते.

AI ChatGPT मध्ये उपलब्ध असणाऱ्या सर्व वैशिष्ट्यांचा वापर आयफोन यूजर्स करू शकणार आहेत. सध्या केवळ हे अॅप अमेरिकेमध्ये (America) लाँच होणार आहे. हे यूजर्स याचा वापर करू शकतात. येत्या काही काळातच AI ChatGPT भारतात देखील येणार असून भारतातील आयफोन युजर्संनासुद्धा याचा वापर लवकरच करता येणार आहे. वापरकर्त्यांनी दिलेल्या प्रतिसादावरून त्यात हवे ते बदल करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. 

  • काय आहे AI ChatGPT?

चॅटजीपीटी म्हणजे (Generative Pretrained Transformer) आहे. हे सॉफ्टवेअर तुम्हाला गुगल प्रमाणे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेही स्पष्ट आणि नेमक्या शब्दात लिहून देते.

  • चॅट जीपीटी कशाप्रकारे काम करतं? 

ओपन एआयने (OpenAI) चॅट जीपीटी (Chat GPT) तयार केला आहे. हे गुगल सर्च इंजिनप्रमाणे काम करते. पण त्याची उत्तर देण्याची पद्धत गुगलपेक्षा खूप वेगळी आहे. गुगल तुम्हाला कोणत्याही प्रश्नाला उत्तर म्हणून अनेक वेबसाइट्सच्या लिंक देते. पण चॅट जीपीटी (Chat GPT) तुमच्या प्रश्नाचे थेट उत्तर देते. त्यामुळे येत्या काळात चॅट GPT गुगलला चांगली टक्कर देऊ शकते. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com