Saif Ali Khan and Kareena Kapoor Khan blessed with baby boy for second time
Saif Ali Khan and Kareena Kapoor Khan blessed with baby boy for second time 
मनोरंजन

सैफ-करीनाच्या घरी छोट्या युवराजांचं आगमन; दुसऱ्यांदा दिला मुलाला जन्म

गोमन्तक वृत्तसेवा

मुंबई : करीना कपूर खान ही आज दुऱ्यांदा आई झाली आहे. दुसऱ्यांदेखील करिना-सैफला मुलगा झाला आहे. काल रात्री करीना कपूर खानला ब्रिच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सैफ अली खान आणि करीना कपूर यांनी ऑगस्ट 2020 मध्ये करिना दुसऱ्यांदा आई होणार असल्याचं जाहीर केलं होतं.यावेळीदेखील तिने बेबी बॉयला जन्म दिला आहे. म्हणजेच, करीना दुसर्‍यांदा मुलाची आई बनली आहे आणि आता सैफ अली खान चौथ्यांदा बाबा झाला आहे. 

करीना कपूरच्या डिलिव्हरीची तारीख 15 फेब्रुवारी असल्याचे सांगण्यात आले. अशा परिस्थितीत तिचे चाहते गेल्या काही दिवसांपासून या बातमीची आतुरतेने वाट पाहत होते.करीना कपूर खानने 2016 मध्ये तिचा पहिला मुलगा तैमूर अली खानला जन्म दिला होता. ज्यानंतर आता हे त्यांचे दुसरे मुल आहे. तथापि, कपूर कुटुंबीयांद्वारे अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. कपूर कुटुंबातील करीना-सैफच्या दुसर्‍या मुलाच्या अधिकृत घोषणेचीही चाहत्यांना प्रतीक्षा आहे.

दुसऱ्या मुलाच्या जन्मापूर्वीच सैफ अली खान आणि करीना कपूर एका मोठ्या घरात शिफ्ट झाले आहेत. या घरात एक खास नर्सरीही तयार केली गेली आहे, तिथे तैमूर आपल्या धाकट्या भावासोबत वेळ घालवू शकेल. यासह, दोघांनीही तैमूर अली खानला नवीन पाहुण्यासाठी तयार करण्यास सुरू केले होते. गरोदरपणाच्या शेवटच्या दिवसांतही करीना सतत काम करत होती. मुलाच्या जन्मानंतर तो तिला बाळाला पूर्ण वेळ देता यावा, म्हणूनच करिनाने आधीपासूनच बॅक-टू-बॅक शूट करून तिचे सगळे काम पूर्ण केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa BJP: प्रतापसिंह राणे यांचा श्रीपादना पाठिंबा, मी संघाची विचारधारा स्वीकारली; विश्वजीत राणे

Goa Today's Top News : राणेंचा गौप्यस्फोट, लोकसभा, राजकारण, अपघात; राज्यातील ठळक बातम्या एका क्लिकवर

Workers March Goa: पोटावर लाथ मारणारे सरकार हवे कशाला? फार्मा कंपन्यांवरील एस्मा मागे घ्या; पणजीत कामगारांचा एल्गार

Zero Shadow Day: सावली गोमन्तकीयांची साथ सोडणार; राज्यात अनुभवता येणार झिरो शाडो

Goa News: गोव्यात वेश्याव्यवसायिक 12 महिलांना मिळाला मतदानाचा अधिकार

SCROLL FOR NEXT