junior NTR
junior NTR 
मनोरंजन

#Happy Birthday Junior NTR ट्रेंड झाला व्हायरल, चाहत्यापासून ते कलाकारांपर्यंत दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

दैनिक गोमंतक

Happy Birthday Junior NTR: साऊथचा सुपर स्टार जूनियर एनटीआर ( N. T. Rama Rao Jr.) त्याच्या जबरदस्त अभिनय आणि दमदार एक्शनसाठी प्रसिद्ध आहे. त्याची एक झलक पाहण्यासाठी त्याचे  हजारो चाहते अनेक दिवस प्रतीक्षा करतात. एनटीआर साऊथच्या चित्रपटासोबतच (South film) तेलगू चित्रपटात देखील तो प्रसिद्ध आहे. आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एनटी रामराव (Former Chief Minister NT Ramrao) यांचे  हे  नातू आहेत. त्यांना एनटीआर या नावाने देखील ओळखले जाते. म्हणूनच त्यांना त्यांचे चाहते "ज्युनियर एनटीआर" (junior NTRम्हणून बोलावतात.  यंदा चाहत्यांना त्याच्या खास दिवशी भेटता येत नाही, म्हणून सामाजिक माध्यमांवर (social media) 'जूनियर एनटीआर' ला  शुभेच्छा देणाऱ्यांचा पाऊसच पडला आहे. आश्चर्य म्हणजे जूनियर एनटीआरच्या (junior NTRवाढदिवसाच्या पहिल्या रात्रीपासून म्हणजेच बुधवारपासून  '#हॅप्पी बर्थ डे एनटीआर' (#HappyBirthday NTR) असा ट्विटरवर ट्रेंड सुरू झाला आहे. (Happy Birthday Junior NTR: South Superstar Junior NTR fans congratulate on social media)

गेल्या वर्षी मेकर्स ने ज्युनिअर एनटीआरचा पहिला लुक चाहत्यांसोबत त्यांच्या वाढदिवासला शेअर केला होता. या चित्रपटात ज्युनिअर एनटीआर स्वातंत्र्य सेनानी कोमाराम भीम  या भूमिकेत दिसणार आहे. त्यांचा लूक शेअर करताना साऊथचे स्टार राम चरणने लिहिले की,  एक शक्तिशाली भीमा आहे. पुढे सांगताना म्हणाले की,  राम चरण आणि ज्युनिअर एनटीआर व्यतिरिक्त आरआरआरमध्ये आलिया भट्ट आणि अजय देवगन देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

ज्युनिअर एनटीआरने चाहत्यांना केले आवाहन

ज्युनिअर एनटीआरने या खास दिवशी चाहत्यांसाठी सोशल मीडियावर एक पोस्टही शेअर केली आहे. त्यात त्याने लिहिले आहे की, माझ्या प्रिय चाहत्यांनो आपणा सर्वांचे मी मनापासून आभारी आहे मी आपले मेसेज, व्हिडिओ आणि शुभेच्छा पाहिल्या आहेत. तुमच्या प्रार्थनांनी मला यश प्राप्त झाले आहे आणि या प्रेमापोटी मी तुमच्या सर्वांचा ऋणी आहे. तो म्हणाला, या माहामारीच्या  काळात तुम्ही मला देऊ शकणारी सर्वात मोठी भेट म्हणजे घरीच राहून लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करा. 
आरआरआरचे (RRR) शूटिंग प्रामुख्याने तेलगू आणि तामिळ भाषेत केले गेले आहे. परंतु मल्याळम, कन्नड आणि हिंदी यासोबतच अनेक भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.  

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Live News: गोव्यात सकाळी नऊपर्यंत 13.02 टक्के मतदान

Lok Sabha Election 2024: ''लोकसभा निवडणुकीनंतर ओबीसींच्या प्रलंबित मागण्या मार्गी लावणार''; CM सावंत यांची ग्वाही

Lok Sabha Election 2024: तिसवाडीत एक लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क; खिस्ती मते ठरणार निर्णायक

Congress Leader Shashi Tharoor: ‘व्‍यक्तिस्‍वातंत्र्य’ अबाधित राहावे; शशी थरूर यांनी लेखक, विचारवंतांशी मडगावात साधला संवाद

Lok Sabha Election 2024: दक्षिण गोव्यात आज विक्रमी मतदानाची शक्यता; विरियातो अन् पल्लवी यांच्यात निकराची लढाई

SCROLL FOR NEXT