Deepika Padukone
Deepika Padukone Instagram
मनोरंजन

Cannes Film Festival: दीपिका पदुकोणने फ्रान्सवरुन व्हिडिओ शेअर करत दाखवली पहिल्या दिवसाची झलक

दैनिक गोमन्तक

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोण कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये (Cannes Film Festival) सहभागी होण्यासाठी फ्रान्समध्ये पोहोचली आहे. यावेळी दीपिका चित्रपट महोत्सवाच्या 75 व्या आवृत्तीत केवळ रेड कार्पेटवरच दिसणार नाही तर ती ज्युरीचा भाग देखील असणार आहे. दीपिकाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आणि 17 मे ते 28 मे दरम्यान होणाऱ्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये येण्याची माहिती दिली. (Cannes Film Festival Deepika Padukone share Vlog)

दीपिकाने (Deepika Padukone) स्वत: विमानतळावर येताना आणि पुढे काय करायचे याबद्दल बोलतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये दीपिका पांढऱ्या टी-शर्टमध्ये आणि निळ्या जॅकेटसह निळ्या डेनिम जीन्समध्ये अतिशय सुंदर दिसत आहे. तिचा नॉन-मेकअप लुक दाखवत, तिने चष्मा आणि तपकिरी रंगाच्या हँडबॅगने तिचा लूक अधिक सुंदर दिसत आहे. या व्हिडिओखाली (Video) तिने 'हॅशटॅग कान्स 2022' असे कॅप्शन दिले आहे.

दीपिका 2017 पासून कान्सचा एक अविभाज्य भाग आहे. यावर्षी ती कान फिल्म फेस्टिव्हलमधील स्पर्धेच्या ज्युरीचा भाग आहे. पाच पुरुष आणि चार महिलांचा समावेश असलेली ज्युरी यंदाच्या पाल्मे डी'ओर विजेत्याची निवड करेल. दीपिका लवकरच शाहरुख खानसोबत 'पठाण' या चित्रपटात दिसणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Delhi Excise Policy Case: केजरीवाल विरुद्ध आमच्याकडे पुरावे, राजकारणाशी आमचा संबंध नाही; ED

Goa Today's Live News: रात्री १० वाजल्यानंतर लाऊड स्पीकर लावण्यासाठी परवानगी मिळण्यासाठी प्रयत्नशील - मुख्यमंत्री

Externment Orders: पास्टर डॉम्निक डिसोझा आणि जुआन मास्करारेन्हसला दिलासा; तडीपारीचा आदेश रद्द

Catholic Wedding: कॅथलिक समाजासाठी विवाहाची वेळ रात्री 12 पर्यंत वाढवावी; चर्चिल आलेमाव यांची मागणी

Goa Rain Update: गोव्यात 11 ते 14 मे दरम्यान तुरळक पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT