sharad pawar.jpg
sharad pawar.jpg 
महाराष्ट्र

शरद पवार रुग्णालयात दाखल; 31 मार्चपर्यंत रुग्णालयात ठेवण्याचा डॉक्टरांचा सल्ला 

दैनिक गोमंतक

मुंबई: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोटदुखीच्या वेदनांनी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना पित्ताशयाचा त्रास  असल्याचे तापसणी अहवालात आढळून आले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी आपल्या अधिकृत ट्वीटर अकाऊंट वरुन याबाबत माहिती दिली आहे. तसेच  एंडोस्कोपी आणि शस्त्रक्रियेनंतर त्यांना रुग्णालयातून सोडण्यात येईल. असेही त्यांनी सांगितले आहे. 

शरद पवार यांना 31 मार्च पर्यंत रुग्णालयात ठेवण्याचा सल्ला डॉक्टरनी दिला आहे. तसेच, एंडोस्कोपी शस्त्रक्रियेनंतर त्यांना रुग्णालयातून सोडण्यात येईल. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर शरद पवारांची रक्त पातळ करणारी औषध बंद केली गेली आहे. असेही नवाब मलिक यांनी सांगितले आहे. दरम्यान, शरद पवार यांनी काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याची बातमी समोर आली होती. शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल हे अहमदाबादहून मुंबईला आले असल्याची माहिती एक गुजराती दैनिकात आली होती. मात्र या शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल कोणालाही भेटले नाहीत, हे भाजपाचे षड्यंत्र आहे, असे सांगत नवाब मलिक यांनी ही केवळ अफवा असल्याचे सांगितले.   

तसेच, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्यातील राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. अॅंटीलिया स्फोटक प्रकरणाचा तपास सुरू झाल्यापासून यात दररोज काहीना काही नव्या गोष्टी समोर येत आहेत. मनसुख हिरेन, सचिन वाझे आणि मुख्य म्हणजे  मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी टाकलेल्या लेटरबॉम्बनंतर तर चांगलीच खळबळ माजली आहे.  थेट राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याभोवती हे प्रकरण फिरत असल्याने आता शरद पवार यांच्यावरील ताण देखील वाढला आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणात पुढे काय  होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.    
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Live News: गोव्यात सकाळी नऊपर्यंत 13.02 टक्के मतदान

Lok Sabha Election 2024: ''लोकसभा निवडणुकीनंतर ओबीसींच्या प्रलंबित मागण्या मार्गी लावणार''; CM सावंत यांची ग्वाही

Lok Sabha Election 2024: तिसवाडीत एक लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क; खिस्ती मते ठरणार निर्णायक

Congress Leader Shashi Tharoor: ‘व्‍यक्तिस्‍वातंत्र्य’ अबाधित राहावे; शशी थरूर यांनी लेखक, विचारवंतांशी मडगावात साधला संवाद

Lok Sabha Election 2024: दक्षिण गोव्यात आज विक्रमी मतदानाची शक्यता; विरियातो अन् पल्लवी यांच्यात निकराची लढाई

SCROLL FOR NEXT