Live Updates

Goa live Updates: अमित पाटकर यांच्याकडून TCP मंत्री आणि इतरांविरुद्ध तक्रार दाखल!!

गोमन्तक डिजिटल टीम

अमित पाटकर यांच्याकडून TCP मंत्री आणि इतरांविरुद्ध तक्रार दाखल!

गोवा काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी DGP कडे मुख्य सचिव, TCP मंत्री विश्वजीत राणे आणि TCP मुख्य नगर नियोजक यांच्या विरोधात बेकायदेशीर जमीन रूपांतरणाची तक्रार दाखल केली असून पुढील तपासासाठी हे प्रकरण CBI कडे देण्याची मागणी केली आहे.

तसेच अमित पाटकर यांनी गोव्याचे कायदे आणि सुव्यवस्था पूर्णपणे बिघडली गेली असल्याचं मोठं विधान केलंय. गोव्यात महिला सुरक्षित नसल्याची काळजी त्यांनी व्यक्त केली आहे. सरकार या गंभीर मुद्यांकडे दुर्लक्ष करत आहे, त्यामुळे आम्ही राज्यपालांना भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार बरखास्त करून ही जबाबदारी त्यांनी स्वतः स्वीकारण्याची मागणी करतो असे अमित पाटकर म्हणालेत.

खुशखबर!! केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3% वाढ

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) 3% वाढ झालीये तसेच पेन्शनधारकांना महागाई दिलासा (Dearness Allowance) देण्याच्या निर्णयाला मंत्रिमंडळाने आज मंजुरी दिली आहे. यामुळे देशातील ४९.१८ लाख सरकारी कर्मचाऱ्यांना आणि ६४.८९ लाख पेन्शनधारकांना फायदा होईल.

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदवार्ता!! लवकरच मिळणार दिवाळी बोनस

दिवाळीचा सण काही दिवसांवर असतानाच राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आलीये. गोव्यात सरकारी कर्मचाऱ्यांना ३१ ऑक्टोबरपूर्वी दिवाळी बोनस मिळणार आहे.

माजी भारतीय क्रिकेटपटू आशिष नेहराच्या मालमत्तेची पाहणी

आमदार वेंझी व्हिएगस, नगर रचना विभागाचे अधिकारी आणि ग्रामस्थांनी बुधवारी माजी भारतीय क्रिकेटपटू आशिष नेहराच्या केळशी येथील मालमत्तेची पाहणी केली. यादरम्यान त्यांनी ज्या जागेवर बेकायदेशीररीत्या रस्ता बांधण्यात आला आहे, त्या जागेच्या तात्काळ पुनर्वसनाची मागणी केलीये.

राज्यात बालरथ योजना सुरु राहणार पण.....

राज्यात सरकार बलरथ योजना सुरू ठेवणार आहे पण योजनेअंतर्गत नवीन बसेस देणार नाही. शाळेच्या व्यवस्थापनाने योजनेचा पैसा वापरत हा उपक्रम सुरु ठेवावा अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे.

वाळपईत सर्वाधिक पाऊस!

राज्यात गेल्या २४ तासांत वाळपईत सर्वाधिक ६१.२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. याशिवाय म्हापश्यात १४.२ मि.मी., पेडण्यात ८.५ मि.मी., फोंड्यात २४.० मि.मी., पणजीत ६.० मि.मी., जुन्या गोव्यात ७.० मि.मी., साखळीत १५.४ मि.मी., काणकोणमध्ये २५.४ मि.मी., दाबोळीत ४२.४ मि.मी., मडगावात १७.४ मि.मी., मुरगाव येथे २९.८ मि.मी., केप्यात ३८.३ मि.मी. आणि सांग्यात ३२.० मि.मी., पावसाची नोंद झाली आहे.

Kursakade Tisk Usgao Accident: तिस्क-उसगाव येथे भीषण अपघात

खुर्साकडे, तिस्क-उसगाव येथे भीषण अपघात झाला. वाहनाच्या धडकेत एका वासरासह तीन गायींचा मृत्यू झाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

World Food Day 2024: गोव्याच्या खाद्यसंस्कृतीविषयीच्या या पाच गोष्टी जाणून घ्या

Calangute Crime: 'नाईट लाईफ' नव्हे ही तर वाईट लाईफ! कळंगूटची प्रतिमा मलीन का होतेय?

Mid Day Meal: मान्यताप्राप्त प्रयोगशाळांमधून मिड-डे-मीलची चाचणी आवश्यक!!

Bicholim News: नो पार्किंग, नो एन्ट्री नावालाच; डिचोलीत वाहतूक व्यवस्थेचा बट्ट्याबोळ

Vithalapur Theft: महिलांच्या हुशारीमुळे चोरीचा प्रयत्न फसला! संशयित पडला छपरावरून खाली; विठ्ठलापूर येथील घटना

SCROLL FOR NEXT