Sunrisers Hyderabad
Sunrisers Hyderabad Dainik Gomantak
क्रीडा

SRH Captain: मयंक अगरवाल नाही, तर द. आफ्रिकेचा 'हा' धाकड IPL मध्ये करणार हैदराबादची 'कॅप्टन्सी'

Pranali Kodre

SRH Captain: इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलच्या 16 व्या हंगामाचे बिगूल काही दिवसांपूर्वीच वाजले आहेत. काही दिवसांपूर्वीच या हंगामाचे वेळापत्रकही जाहीर झाले आहे. त्यामुळे संघांची या हंगामासाठी तयारी सुरू असून आता गुरुवारी (23 फेब्रुवारी) सनरायझर्स हैदराबाद संघाने त्यांच्या नव्या कर्णधाराची घोषणा केली आहे.

सनरायझर्स हैदराबादने आयपीएल 2023 हंगामासाठी दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू एडेन मार्करम याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे. याबद्दल सोशल मीडियावरून सनरायझर्सने घोषणा केली आहे. त्यांनी मार्करमकडे कर्णधारपद दिल्याची पोस्ट शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की 'प्रतिक्षा संपली आहे. आमच्या नवा कर्णधार एडेन मार्करमचे स्वागत करा.'

दरम्यान, हैदराबादने यावर्षीच्या आयपीएल हंगामासाठी त्यांचा माजी कर्णधार केन विलियम्सनला संघात कायम केले नव्हते. त्याचमुळे यंदा या संघाला नवा कर्णधार मिळणार हे निश्चित होते. त्यामुळे कर्णधारपदासाठी 8.25 कोटींना खरेदी केलेला मयंक अगरवाल, वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि मार्करम हे तिघे प्रबळ दावेदार होते.

पण या तिघांमध्ये हैदराबादने मार्करमवर हैदराबादने विश्वास दाखवला आहे. लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही की सन ग्रुपची मालकी असलेल्या सनरायझर्स इस्टर्न केप या संघाने मार्करमच्याच नेतृत्वाखाली काही दिवसांपूर्वी पहिल्या साऊथ आफ्रिका टी20 लीगचे विजेतेपद नावावर केले आहे. सनरायझर्स हैदराबादची मालकीही सन ग्रुपकडेच आहे.

(Sunrisers Hyderabad announce Aiden Markram as their captain for IPL 2023)

मार्करमने साऊथ आफ्रिका टी20 लीगच्या यावर्षी झालेल्या पहिल्याच हंगामात सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कारही मिळवला होता. त्याने या हंगामात 12 सामन्यांत 33.27 च्या सरासरीने 366 धावा आणि 11 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच त्याने जोहान्सबर्ग सुपर किंग्सविरुद्ध उपांत्य सामन्यात शतकी खेळीही केली होती.

तसेच मार्करम हैदराबादचाही महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याने आयपीएल 2022 हंगामात 14 सामन्यांत संघासाठी 47.63 च्या सरासरीने 381 धावा केल्या होत्या.

आयपीएल 2023 हंगामासाठी सनरायझर्स हैदराबादचा संघ -

एडेन मार्करम (कर्णधार), अब्दुल सामद, अभिषेक शर्मा, भुवनेश्वर कुमार, फझलहक फारुकी, ग्लेन फिलिप्स, कार्तिक त्यागी, मार्को यान्सिन, राहुल त्रिपाठी, टी नटराजन, उमरान मलिक, वॉशिंग्टन सुंदर, अनमोलप्रीत सिंग, अकिल हुसेन, नितीश कुमार रेड्डी, मयंक डागर, उपेंद्र यादव, सनवीर सिंग, समर्थ व्यास, विवरांत शर्मा, मयंक मार्कंडे, आदील राशिद, हेन्रीच क्लासेन, मयंक अगरवाल, हॅरी ब्रुक.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa BJP: प्रतापसिंह राणे यांचा श्रीपादना पाठिंबा, मी संघाची विचारधारा स्वीकारली; विश्वजीत राणे

Goa Today's Top News : राणेंचा गौप्यस्फोट, लोकसभा, राजकारण, अपघात; राज्यातील ठळक बातम्या एका क्लिकवर

Workers March Goa: पोटावर लाथ मारणारे सरकार हवे कशाला? फार्मा कंपन्यांवरील एस्मा मागे घ्या; पणजीत कामगारांचा एल्गार

Zero Shadow Day: सावली गोमन्तकीयांची साथ सोडणार; राज्यात अनुभवता येणार झिरो शाडो

Goa News: गोव्यात वेश्याव्यवसायिक 12 महिलांना मिळाला मतदानाचा अधिकार

SCROLL FOR NEXT