Umran malik
Umran malik Twitter
क्रीडा

157 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करणारा उमरान भारतीय संघात हवा: हरभजन सिंग

दैनिक गोमन्तक

भारताचा माजी ऑफस्पिनर हरभजन सिंगला युवा वेगवान गोलंदाज उमरान मलिकचा (umran malik) भारतीय संघात (Team India) समावेश करायचा आहे. हरभजनला (harbhajan singh) ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T20 विश्वचषकात जसप्रीत बुमराहसोबत उमरानची गोलंदाजी पाहायची आहे. सध्याच्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळणारा 22 वर्षीय मलिक सातत्याने 150 किमी प्रतितासाच्या वेगाने गोलंदाजी करत आहे. त्याने आतापर्यंत 15 विकेट घेतल्या आहेत. (Umran malik indian team)

कसोटी क्रिकेटमध्ये 400 हून अधिक बळी घेणारा हरभजन सिंग म्हणाला, "उमरान मलिक माझा आवडता गोलंदाज आहे, मला त्याला भारतीय संघात पाहायचे आहे कारण तो एक महान गोलंदाज आहे. 150 किमी प्रतितास पेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी आणि देशासाठी खेळत नाही याच मला आश्चर्य वाटतं म्हणूनच मला वाटते की तो भारतीय संघात आला तर चांगले होईल आणि तरुणांना तो खेळ घेण्यासाठी प्रेरित करेल. तो आयपीएलमध्ये जो काही खेळ खेळतोय तोत अविश्वसनीय आहे.

हरभजन सिंग पुढे म्हणाला, “त्याची निवड होईल की नाही हे मला माहीत नाही, पण मी निवड समितीचा भाग असतो तर मी त्याचा समावेश नक्कीच भारतीय संघात केला केला असता. उमरान मलिकने ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 विश्वचषकात जसप्रीत बुमराहसोबत गोलंदाजी करावी.” हरभजनशिवाय भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनीही उमरानचा भारतीय संघात समावेश करण्याची मागणी केली आहे. उमरानने भारतीय संघासोबत इंग्लंडचा दौरा करावा, असे गावस्कर यांनी म्हटले आहे.

उमरान मलिकने आयपीएल 2022 मध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध आयपीएल इतिहासातील दुसरा सर्वात वेगवान चेंडू टाकला आहे. उमरानने 157 किलोमीटर वेगाने चेंडू टाकला. आयपीएलच्या इतिहासात फक्त शॉन टेटनेच त्याच्यापेक्षा वेगवान गोलंदाजी केली आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू टेटने 157.7 किमी वेगाने चेंडू फेकला आहे. उमरानही शोएब अख्तर, ब्रेट ली, शेन बॉण्ड यांच्याप्रमाणे 155 च्या वेगाने गोलंदाजी करत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa BJP: प्रतापसिंह राणे यांचा श्रीपादना पाठिंबा, मी संघाची विचारधारा स्वीकारली; विश्वजीत राणे

Goa Today's Top News : राणेंचा गौप्यस्फोट, लोकसभा, राजकारण, अपघात; राज्यातील ठळक बातम्या एका क्लिकवर

Workers March Goa: पोटावर लाथ मारणारे सरकार हवे कशाला? फार्मा कंपन्यांवरील एस्मा मागे घ्या; पणजीत कामगारांचा एल्गार

Zero Shadow Day: सावली गोमन्तकीयांची साथ सोडणार; राज्यात अनुभवता येणार झिरो शाडो

Goa News: गोव्यात वेश्याव्यवसायिक 12 महिलांना मिळाला मतदानाचा अधिकार

SCROLL FOR NEXT