Team India
Team India Dainik Gomantak
क्रीडा

India vs New Zealand: दुसऱ्या वनडेसाठी टीम इंडियात मोठा बदल? अशी असेल Playing XI

Pranali Kodre

India vs New Zealand 2nd ODI: भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात शनिवारी वनडे मालिकेतील दुसरा सामना खेळवला जाणार आहे. हा सामना रायपूरमधील शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सुरुवात होईल. दरम्यान या सामन्यासाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये फार बदल होण्याची शक्यता कमी आहे.

भारताने न्यूझीलंडविरुद्ध हैदराबादमध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात विजय मिळवला होता. त्यामुळे भारतीय संघव्यवस्थापन दुसऱ्या वनडेसाठी भारतीय संघाचे विजयी संयोजन बदलण्याच्या शक्यता कमी आहे.

त्यामुळे दुसऱ्या वनडेसाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये सलामीला रोहित शर्माबरोबर हैदराबाद वनडेमध्ये द्विशतक झळकावणारा शुभमन गिलच दिसू शकतो. तर मधल्या फळीत विराट कोहली, सूर्यकुमार यादव आणि ईशान किशन कायम राहू शकतात. ईशान यष्टीरक्षणाची जबाबदारीही सांभाळेल. तसेच रोहितने वनडे मालिकेपूर्वीच स्पष्ट केल्याप्रमाणे ईशान मधल्या फळीतच फलंदाजी करताना दिसेल.

त्याचबरोबर हार्दिक पंड्या अष्टपैलू म्हणून तसेच उपकर्णधार म्हणून संघात असेल. त्याच्यासह अष्टपैलू म्हणून वॉशिंग्टन सुंदरही प्लेइंग इलेव्हनमध्ये दिसू शकतो.

पण, गोलंदाजी फळीत एक बदल होण्याची शक्यता आहे. शार्दुल ठाकूर ऐवजी दुसऱ्या वनडेसाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये उमरान मलिकला संधी मिळू शकते. शार्दुलने पहिल्या वनडेत गोलंदाजी करताना थोडा संघर्ष केला होता.

तसेच मलिकने मात्र, श्रीलंकेविरुद्ध झालेल्या वनडे आणि टी20 मालिकेत प्रभावशाली कामगिरी केली होती. त्यामुळे त्याला पसंती दिली जाऊ शकते. त्याला वेगवान गोलंदाजीत मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमीची साथ मिळू शकते.

तसेच कुलदीप यादवही सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे तोही संघातील स्थान कायम ठेवू शकतो. त्यामुळे चहलला मात्र प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्यासाठी आणखी प्रतिक्षा करावी लागू शकते.

दरम्यान, दुसऱ्या वनडे सामन्यात विजय मिळवून भारताला मालिकेत विजयी आघाडी घेण्याची संधी आहे. तर न्यूझीलंड दुसरा वनडे सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याचा प्रयत्न करेल.

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेसाठी भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ईशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, उमरान मलिक.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : सावर्डेतून भाजपला मिळवून देणार २० हजार मताधिक्‍य; भाजप मंडळाची ग्‍वाही

Panaji News : विरोधकांनी स्वप्नेच पहावी! बाबूश मोन्सेरात

Congress News : काँग्रेसच्या दिग्गजांची पाठ; विराट सभांना फाटा

Panaji News : पणजीत पोर्तुगीजकालीन नाल्यांची सफाई

Goa Dam : पावसाळ्यापर्यंत राज्यात पाणीटंचाईची शक्यता नाही; धरणांमध्ये पुरेसा जलसाठा

SCROLL FOR NEXT