Samosa
Samosa Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Samosa Recipe: तांदळाचे चविष्ट समोसे एकदा खाऊन पहाच

दैनिक गोमन्तक

Samosa Recipe: बटाट्यापासून बनलेला समोसा तुम्ही नक्कीच खाल्ले असेल, पण आम्ही तुम्हाला तांदळाचा समोसा कसा बनवायचा ते सांगणार आहोत. ही अशी रेसिपी आहे जी एकदा चाखली की पुन्हा पुन्हा खायची इच्छा होईल. चला जाणून घेऊया तांदळाचे समोसे बनवण्याची सोपी पद्धत.

  • समोसे बनवण्यासाठी लागणारे साहित्य

1 कप - शिजवलेला भात

1 कप - मैदा पीठ

1/2 टीस्पून - लोणी

1 चमचा - तूप

1/4 कप - चिरलेला कांदा

तळण्यासाठी तेल

चवीनुसार मीठ

  • कृती

प्रथम १ कप तांदूळ कुकरमध्ये शिजवून घ्या.

मग, गॅसवर पॅन ठेवा आणि त्यात थोडं लोणी किंवा तूप घाला.

यानंतर बारीक चिरलेल्या मिरच्या आणि कांदे हलके तळून घ्या.

आता त्यात शिजवलेला भात घाला आणि चवीनुसार चिली सॉस आणि मीठ घाला.

हे सर्व 2 मिनिटे शिजवा आणि गॅस बंद करा.

अशा प्रकारे समोशाचे फिलिंग तयार होते.

तांदळाचा समोसा (Samosa) बनवण्यासाठी सारणासोबतच त्यासाठी पीठ मळून घेणे महत्त्वाचे आहे. एका भांड्यात 1 कप मैदा घ्या. त्यात चिमूटभर मीठ आणि तूप आणि थोडे कोमट पाणी घालून मळून घ्या. यानंतर मळलेले पीठ ओल्या सुती कापडाने 15 मिनिट तसेच झाकून ठेवा.

Samosa

पुढे ते पीठ 15 मिनिटानंतर पुन्हा एकदा मळून घ्या. गोल रोटीचा आकार बनवल्यानंतर मधूनमधून कापून घ्या. एक भाग घेऊन त्रिकोण बनवा आणि त्यात फिलिंग भरा. दुसर्‍या वरच्या भागाच्या एका बाजूला पाणी लावून समोशाचा आकार देऊन चिकटवा. अशा प्रकारे सर्व समोसे तयार करा.

तांदळाचे (Rice) समोसे बनवण्याची शेवटची स्टेप म्हणजे गॅसवर तवा ठेवा. त्यात तेल घालून मंद आचेवर गरम करा. आता एक एक करून समोसा टाका. आता हे समोसे डीप फ्राय करा. यानंतर चटणीसोबत खाऊ शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : सावर्डेतून भाजपला मिळवून देणार २० हजार मताधिक्‍य; भाजप मंडळाची ग्‍वाही

Panaji News : विरोधकांनी स्वप्नेच पहावी! बाबूश मोन्सेरात

Congress News : काँग्रेसच्या दिग्गजांची पाठ; विराट सभांना फाटा

Panaji News : पणजीत पोर्तुगीजकालीन नाल्यांची सफाई

Goa Dam : पावसाळ्यापर्यंत राज्यात पाणीटंचाईची शक्यता नाही; धरणांमध्ये पुरेसा जलसाठा

SCROLL FOR NEXT