The patient recovery rate increased to 52.8%
The patient recovery rate increased to 52.8% 
लाइफस्टाइल

रुग्ण बरे होण्याचा दर 52.8% पर्यंत वाढला

pib

नवी दिल्ली, 

गेल्या 24 तासात कोविड-19 चे 6922 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत कोविड-19 चे एकूण 1,86,934 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर 52.80% पर्यंत वाढला आहे. सध्या, 1,55,227 रुग्ण वैद्यकीय देखरेखीखाली आहेत.

सरकारी प्रयोगशाळांची संख्या 674 आणि खासगी प्रयोगशाळांची संख्या 250 (एकूण 924) पर्यंत वाढवली आहे.  विभागणी पुढे दिली आहे -

रीअल-टाइम आरटी पीसीआर आधारित चाचणी प्रयोगशाळा : 535 (सरकारी 347 + खाजगी 188)

ट्रू नॅट आधारित चाचणी प्रयोगशाळा : 316  (सरकारी 302  + खाजगी 14)

सीबीएनएएटी आधारित चाचणी प्रयोगशाळा : 73 (सरकारी 25 + खाजगी 48)

गेल्या 24 तासांत 1,63,187 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली. आतापर्यंत चाचणी केलेल्या नमुन्यांची एकूण संख्या 60,84,256 इतकी आहे.

कोविड -19 शी संबंधित सर्व  तांत्रिक मुद्यांविषयी, मार्गदर्शक तत्वांविषयी आणि सूचनांसंबंधी अधिकृत आणि अद्ययावत माहितीसाठी कृपया येथे नियमितपणे भेट द्या:- https://www.mohfw.gov.in/ आणि @MOHFW_INDIA.

कोविड -19 शी संबंधित तांत्रिक प्रश्न technicalquery.covid19@gov.in यावर तर इतर प्रश्न ncov2019@gov.in आणि @CovidIndiaSeva यावर पाठवू शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa BJP: प्रतापसिंह राणे यांचा श्रीपादना पाठिंबा, मी संघाची विचारधारा स्वीकारली; विश्वजीत राणे

Goa Today's Top News : राणेंचा गौप्यस्फोट, लोकसभा, राजकारण, अपघात; राज्यातील ठळक बातम्या एका क्लिकवर

Workers March Goa: पोटावर लाथ मारणारे सरकार हवे कशाला? फार्मा कंपन्यांवरील एस्मा मागे घ्या; पणजीत कामगारांचा एल्गार

Zero Shadow Day: सावली गोमन्तकीयांची साथ सोडणार; राज्यात अनुभवता येणार झिरो शाडो

Goa News: गोव्यात वेश्याव्यवसायिक 12 महिलांना मिळाला मतदानाचा अधिकार

SCROLL FOR NEXT