Pakora Recipe
Pakora Recipe Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Pakora Recipe: उरलेल्या भातापासून बनवा कुरकुरीत पकोडे

दैनिक गोमन्तक

अनेकांच्या घरी भात हा बनवलाच जातो. पण कधी भात जास्त झाल्यास भात फेकून देउ नका.कारण उरलेल्या भातापासून (Rice) चवदार आणि कुरकुरीत पकोडे तयार करू शकता. तुम्ही या पाकोड्यांचा आनंद संध्याकाळी चहासोबत (Tea) देखील घेऊ शकता.चला तर मग जाणून घेऊया झटपट तयार होणाऱ्या पकोड्याची रेसिपी (Rice Pakora Recipe )

Rice Pakora

राइस पकोडे बनवण्यासाठी लागणारे साहित्य
- एक वाटी शिजवलेला भात

- बेसन दोन वाट्या

- बारीक चिरलेला कांदा

-आले किसलेले

-अर्धा चमचा लाल मिरची पावडर

- हळद

- हिरवी मिरची - दोन

- हिंग

- धने पावडर

- अजवाइन

- जिरे पावडर

- बारीक चिरलेली कोथिंबीर

- तेल

- चवीनुसार मीठ

कृती
सर्वात पहिले उरलेला भात चांगला बारीक करून घ्यावा. यानंतर त्यात बेसन, बारीक चिरलेला कांदा, हिरवे धणे, लाल तिखट, किसलेले आले घालून सर्व चांगले मिक्स करून घ्या. आता त्यात जिरेपूड, धनेपूड, हिंग, आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करावे. हे मिश्रण दहा मिनिटे बाजूला ठेवा. नंतर एका कढईत तेल गरम करून पकोडे तळून घ्यावे. तुमचे चविष्ट कुरकुरीत राइस पकोडे तयार आहेत. संध्याकाळच्या गरम चहासोबत किंवा हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करू शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vegetable Prices Update: राज्यात फळभाज्यांचे दर भडकले, लसूण 320 रुपये किलो; सर्वसामान्यांना महागाईचे चटके

Blue Origin Flight: ऐतिहासिक! राकेश शर्मानंतर गोपीचंद थोटाकुरा ठरले अंतराळात जाणारे दुसरे भारतीय

Holy Spirit Feast In Margao: होली स्पिरिट चर्चच्या फेस्ताची सुरवात; मडगाव पालिकेचे 35 लाख महसुलाचे लक्ष्य

Egg Prices Increased: गोव्यात मासळीपाठोपाठ आता बॉयलर अंड्यांचे भाव गगनाला भिडले; दरातील चढउतार सुरूच

Kushavati River: केपेतील ‘कुशावती’चे पाणी प्रदूषित; ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात!

SCROLL FOR NEXT