Karela Recipe: कडू कारल्याला द्या मसालेदार कबाबची चव

कारल्यापासून बनवा चवदार आणि झटपट रेसिपी
Karela Recipe
Karela RecipeDainik Gomantak

कारले पाहिल्यानंतर अनेकांचे तोंड वाकडे होतात. पण कारल्याची चव ही कडू लागते असे नाही. आपल्या बनवण्याच्या पद्धतीमध्ये बदल केल्यास कारल्याची कडू चव देखील बदलू शकते. कारल्यामध्ये कॅलरी, कार्ब, फायबर, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, फोलेट, पोटॅशियम, झिंक यांसारखे पोषक घटक असतात. कारले आरोग्यदायी (Health) असते. यामुळे त्याचे सेवन करणे गरजेचे आहे. चला तर कारल्यापासून कबाब बनवून पाहूया. (Karela Recipe News)

* साहित्य
2 कारले
1 टीस्पून जिरे
1 टीस्पून बारीक चिरलेले आले
100 ग्रॅम पालक
1/2 टीस्पून काळी मिरी
1/2 कप खवा
1/2 कप बेसन
1 टीस्पून तूप
2 टीस्पून बारीक चिरलेला लसूण
1 वाटी वाटाणा
5 बदाम
50 ग्रॅम कॉर्न
मीठ चवीनुसार

Karela Recipe
गोव्यात व्हेज आणि नॉनव्हेज 'Mezze' चा घ्या आस्वाद

* कृती


सर्वप्रथम कढईत तूप गरम करावे. नंतर त्यात जिरे, लसूण, आल घालून गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळावे. आता कारले, बीन्स, बटाटा, काळी मिरी आणि मीठ घालावे. साधारण दोन मिनिटे शिजू द्यावे. नंतर बदाम, खवा आणि कॉर्न घालावे. आता त्यात भाजलेले बेसन घालून मिश्रणाचे पीठ मळून घ्या. या पिठापासून कबाब बनवावे,नंकरू शकता तर भाजून घ्यावे. तयार कारल काबाब तुम्ही भाकरी किंवा चपातीसह सर्व्ह करू शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com