Hair Care
Hair Care  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Hair care Tips: केसांच्या आरोग्यासाठी बदामाच्या सालीचे जादुई फायदे, जाणून घ्या

दैनिक गोमन्तक

Hair care Tips: भाज्या आणि फळांच्या सालीमध्ये अनेक पोषक तत्व असतात. जी शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. यामुळेच अनेकजण फळे आणि भाज्यांमधून बाहेर पडणाऱ्या सालीचा उपयोग चांगल्या प्रकारे करतात. जेव्हा फळे आणि भाज्यांची साले वापरली जाऊ शकतात, तर बदामाची साल का नाही. होय, बदामाच्या सालीमध्ये भरपूर व्हिटॅमिन, मिनरल आणि अँटी-ऑक्सिडंट असतात. जे केसांचे आणि त्वचेचे पोषण करतात.

बदामाची साल केसांमधील ओलावा आणि चमक टिकवून ठेवण्यास मदत करते. बदामाच्या सालीचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. ते समजल्यावर तुम्ही बदामाची साल पुन्हा फेकण्याची चूक करणार नाही. चला तर त्याबद्दल जाणून घेऊयात.

बदामाचे अनेक फायदे आहेत. बदामाचा वापर शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो. बदामच नाही तर बदामाच्या सालींमुळेही अनेक हेल्थ प्रॅाब्लेम दूर होतात. तज्ञांच्या मते, बदामाच्या सालीमध्ये भरपूर व्हिटॅमिन-ई असते. जे केसांसाठी खूप फायदेशीर आहे. केस (hair) मजबूत (strong) करण्यासाठी तुम्ही बदामाची साल अंडी, मध आणि कोरफड जेलमध्ये मिसळून हेअर मास्क बनवू शकता. हा मास्क केसांवर 15-20 मिनिटे ठेवा आणि नंतर धुवा.

तसेच, बदामाच्या सालीमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन-ई मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे ते त्वचेसाठी फायदेशीर असते. तसेच त्यामुळे त्वचेच्या समस्या दूर होण्यास मदत होते. बदामाची साल तुम्ही कोणत्याही फेसपॅकमध्ये वापरु शकता. त्याच्या नियमित वापराने त्वचा हायड्रेटेड दिसू लागते. बदाम त्वचेच्या आरोग्यासाठी वरदानच म्हणायला हवे.

स्कॅल्पशी संबंधित समस्यांवर बदामाची (almond) साल फायदेशीर ठरू शकते. स्कॅल्पला खाज येण्याची समस्या असेल किंवा डोक्यात उवा असतील तर बदामाच्या सालीचा वापर करू शकता. आयुर्वेदानुसार बदामाची सालं कुस्करून डोक्याच्या त्वचेवर लावल्यास या समस्येपासून लवकर सुटका मिळू शकते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa BJP: प्रतापसिंह राणे यांचा श्रीपादना पाठिंबा, मी संघाची विचारधारा स्वीकारली; विश्वजीत राणे

Goa Today's Top News : राणेंचा गौप्यस्फोट, लोकसभा, राजकारण, अपघात; राज्यातील ठळक बातम्या एका क्लिकवर

Workers March Goa: पोटावर लाथ मारणारे सरकार हवे कशाला? फार्मा कंपन्यांवरील एस्मा मागे घ्या; पणजीत कामगारांचा एल्गार

Zero Shadow Day: सावली गोमन्तकीयांची साथ सोडणार; राज्यात अनुभवता येणार झिरो शाडो

Goa News: गोव्यात वेश्याव्यवसायिक 12 महिलांना मिळाला मतदानाचा अधिकार

SCROLL FOR NEXT