Mothers Day
Mothers Day Dainik Gomantak
Image Story

Mothers Day : आईचं मोठेपण सांगणारे हे चित्रपट जरुर पाहा

Rahul sadolikar

मदर्स डेच्या निमित्ताने असे काही चित्रपट आठवतात जे खऱ्या अर्थाने आईचे मोठेपण दाखवतात. आज मदर्स डे जगभरात साजरा केला जात आहे. यानिमित्तानं वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर अनेक पोस्ट व्हायरल होत आहे.

बॉलीवूड आणि ओटीटीवरही आई, आईपण आणि आईचे महत्व विशद करणारे चित्रपट उपलब्ध आहे. आजच्या दिवसाच्या निमित्तानं कोणते चित्रपट आवर्जून पाहावेत हे आपण जाणून घेणार आहोत.

मॉम -

आवर्जून पाहावा असा चित्रपट म्हणून मॉमचा उल्लेख करावा लागेल. प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारा असा हा चित्रपट आहे. त्यामध्ये श्रीदेवी, नवाझुद्दीन सिद्धिकी, अक्षय खन्ना यांच्या प्रमुख भूमिका आहे. नेटफ्लिक्सवर हा चित्रपट पाहता येईल. मदर्स डे च्या निमित्तानं हा चित्रपट न चुकवण्यासारखा आहे.

Mothers Day

हम आपके है मॉम -

प्रत्येकानं पाहवा असा कौटूंबिक चित्रपट म्हणून या चित्रपटाचा उल्लेख करावा लागेल. या चित्रपटानं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केल्याचे दिसून आले. आई आणि मुलं, मुली यांच्यातील नाते वेगळ्या प्रकारे आपल्यासमोर येते. मदर्स डे च्या निमित्तानं हा चित्रपट उत्तम पर्याय आहे.

Mothers Day

मॉम अँड को-

मॉम अँड को हा एक हदयस्पर्शी चित्रपट होता. तो तुम्हाला मॅक्स प्लेयरवर पाहता येईल. आई आणि मुलामधील संवेदनशील नातं या चित्रपटाच्या माध्यमातून अनुभवता येईल. आई आणि मुलगा डबा पोहचविण्याचे काम सुरु करतात. त्याला मिळणारा प्रतिसाद या चित्रपटाच्या माध्यमातून अधोरेखित करण्यात आला आहे.

Mothers Day

सिक्रेट सुपरस्टार -

आमिर खानची भूमिका असणारा हा चित्रपट कमालीचा लोकप्रिय झाला होता. त्यामध्ये झरीना वसीमनं केलेली भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. त्या चित्रपटानं एका वेगळ्या विषयाला स्पर्श करुन प्रेक्षकांना प्रतिक्रिया देण्यास भाग पाडले होते. फेमिनिझम विषयावर केलेलं भाष्य सिक्रेट सुपरस्टारमधून ज्याप्रकारे करण्यात आले त्यामुळे तो चर्चेत आला होता.

Mothers Day

माई -

माई ही सीरिज नेटफ्लिक्सवर पाहता येईल. साक्षी तंवरनं या चित्रपटामध्ये केलेली आईची भूमिका सर्वोत्तम म्हणावी लागेल. प्रेक्षकांचा या सीरिजला मोठा प्रतिसाद मिळाला होता. शिल चौधरी नावाच्या व्यक्तिरेखेची ही स्टोरी आहे. एका सर्वसामान्य कुटूंबातील ती महिला आहे. जी एक आई आणि नर्स आहे. तिचा संघर्ष या चित्रपटामध्ये प्रभावीपणे मांडण्यात आला आहे

Mothers Day

मेंटलहुड -

मदर्स डे च्यानिमित्तानं तुम्हाला पाहण्यासाठी मेंटलहुड चांगला ऑप्शन आहे. सध्याच्या काळातील आईपण किती संघर्षदायी आहे. हे प्रभावीपणे या चित्रपटातून दिग्दर्शकानं आपल्यासमोर मांडले आहे. त्यामध्ये अभिनेत्री करिश्मा कपूर, संजय सूरी, संध्या मृदुल यांच्या भूमिका आहेत.

Mothers Day

निल बेट्टी सन्नाटा -

हा चित्रपट पाहिल्यावर डोळ्यांच्या कडा ओलावल्याशिवाय राहणार नाही. अक्षरे ओळखता न येणे, अंकमोड करायला अडचणी येण यामुळे तिची मुलगी त्रस्त आहे. त्यासाठी तिची आई मात्र काहीही करायला तयार आहे. आपल्या लेकीला सगळ्यांपेक्षा हुशार करायचे. अशी तिची इच्छा आहे. अश्विनी अय्यर तिवारी यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट अॅमेझॉन प्राईमवर पाहता येईल.

Mothers Day

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai Goa Highway: ठाकरे गटातील नेत्याच्या हत्येचा प्रयत्न, आमदाराच्या मुलावर आरोप; मुंबई-गोवा महामार्गावरील घटना

PM Modi On UCC: गोव्याकडे पाहा! समान नागरी कायद्यावरुन प्रश्न विचारणाऱ्यांना PM मोदींचा सल्ला

Goa Today's Live News: NEET परीक्षा, विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; परीक्षा केंद्रात बदल

Goa News : लोकसभा निवडणूक २०२४; मगोपची सावईवेरे येथे प्रचार सभा

पालकांना त्यांच्या मुलांची नावं राहुल गांधी किंवा लालू यादव ठेवण्यापासून कोण रोखू शकेल?: जाणून घ्या SC ने असे म्हटले

SCROLL FOR NEXT