Tulsi wedding on Kartik full moon in Goa
Tulsi wedding on Kartik full moon in Goa 
गोवा

गोव्यातील बाजारात तुळशी विवाहासाठी लागणारे उपलब्ध

दैनिक गोमंतक

पणजीः बाजारात तुळशी विवाहसाठी लागणारे साहित्य उस, चिंचेची फांदी,आवळ्याची फादी,डिण्याचे झाड.आंब्याच्या ताळा व ईतर २०० रुपय दराने विकले जात आहे.  दसरा, दिवाळी उत्सव साजरा होत असतानाच उत्सवप्रिय नागरिकांना वेध लागले ते कार्तिक एकादशी आणि तुळशीविवाहाचे. मोठी थोरली दिवाळी म्हणून तुळशीविवाह उत्सव दिवाळीच्या बाराव्यादिवशी साजरा होत असून कार्तिक पौर्णिमा म्हणजे रविवारी २९ पर्यंत लोक आपल्या घरी तुळशीविवाह साजरा करतात. 

दिवाळीसाठी घरासमोर लावलेले आकाशदीप, विजेची रोषणाई, नित्य रात्री पणत्याची केली जाणारी आरास ही तुळशीच्या लग्नापर्यंत चालू ठेवलेली असते. तुळशीच्या लग्नानिमित्त अंगणातील तुळशीवृंदावनाची स्वच्छता करून रंगरंगोटी करण्याच्या कामाला आता प्रारंभ झालेला आहे. 

तुळशीविवाहासाठी दिंडा, उस, चिंचा, आवळे, आदीबरोबरच पोहे चुरमुरे लागतात. बाजारात तुळशीच्या लग्नाचे साहित्य उपलब्ध होऊ लागले आहेत. बऱ्याच जणांच्या घरी ब्राह्मणांकरवी तुळशीची पूजा करून मंगलाष्टके म्हणून तुळशीचे लग्न केले जाते. त्यानंतर सुवासिनी जोडवी पेटवून तुळशीची ओवाळणी करतात. तुळशीच्या लग्नानिमित्त एकमेकांच्या घरी जाऊन तुळशीपत्र साजरे केले जाते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa BJP: प्रतापसिंह राणे यांचा श्रीपादना पाठिंबा, मी संघाची विचारधारा स्वीकारली; विश्वजीत राणे

Goa Today's Top News : राणेंचा गौप्यस्फोट, लोकसभा, राजकारण, अपघात; राज्यातील ठळक बातम्या एका क्लिकवर

Workers March Goa: पोटावर लाथ मारणारे सरकार हवे कशाला? फार्मा कंपन्यांवरील एस्मा मागे घ्या; पणजीत कामगारांचा एल्गार

Zero Shadow Day: सावली गोमन्तकीयांची साथ सोडणार; राज्यात अनुभवता येणार झिरो शाडो

Goa News: गोव्यात वेश्याव्यवसायिक 12 महिलांना मिळाला मतदानाचा अधिकार

SCROLL FOR NEXT