Michael Lobo | Congress vs BJP Dainik Gomantak
गोवा

...तोपर्यंत मीच विरोधी पक्षनेता राहणार; लोबोंनी ठणकावलं

आदित्य जोशी

पणजी : गोव्यात काँग्रेस आमदारांचं नाराजीनाट्य रंगल्यानंतर पक्षाकडून दिगंबर कामत आणि मायकल लोबो यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली होती. गोवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्याकडून दोन्ही आमदारांविरोधात अपात्रता याचिका दाखल करण्यात आली होती. विधानसभा अध्यक्षांकडे अपात्रता याचिका दाखल केल्यानंतर अजूनही त्यावर सभापती रमेश तवडकर यांनी कोणताही निर्णय दिलेला नाही. त्यामुळे जोपर्यंत निर्णय होत नाही आणि अपात्रता याचिका सभापतींकडून स्वीकारली जात नाही तोपर्यंत आपणच विरोधी पक्षनेता राहणार असल्याचा दावा कळंगुटचे आमदार आणि काँग्रेस नेते मायकल लोबो यांनी केला आहे.

दिगंबर कामत आणि मायकल लोबो यांच्या विरोधात काँग्रेसने पक्षविरोधी कारवायांसाठी दाखल केलेल्या अपात्रतेच्या याचिकेची सभापतींच्या कार्यालयाकडून छाननी सुरू असल्याची माहिती पाटकर यांनी दिली होती. तसंच या याचिकेवर आम्ही युक्तिवाद करू. प्रथमच आम्ही एक आदर्श ठेवला आहे आणि कठोर कारवाई केली आहे, असा दावा पाटकर यांनी केला होता. याचवेळी मायकल लोबोंना विधानसभेच्या विरोधीपक्षनेतेपदावरुन दूर केल्याचंही पाटकर यांनी स्पष्ट केलं होतं.

दरम्यान काँग्रेस सरचिटणीस मुकुल वासनिक यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत विरोधी पक्षनेत्याचा निर्णय घेतला जाईल आणि त्याबाबतची घोषणा केली जाईल, असं गोवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी सांगितले होतं. मात्र मुकुल वासनिक यांच्यासोबतच्या बैठकीला सर्व बंडखोर आमदारांनी हजेरी लावली. यानंतर मायकल लोबोंनीही स्थानिक नेतृत्वाला लक्ष्य केलं आहे. तसंच त्यांनी घेतलेल्या निर्णयांनाही आव्हान देत जोपर्यंत सभापती निर्णय घेत नाहीत तोपर्यंत आपणच विरोधी पक्षनेता असल्याचा दावा केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Israel-Iran War: इस्रायल-इराण युद्धानं सर्वसामान्यांचं बजेट कोलमडणार! भारतासह जगभरातील देशांना बसणार फटका

वेलिंगकरप्रकरणी 'लुकआऊट नोटीस' जारी! हिंदुत्ववादी संघटनांचे समर्थन; पोलिसांची पथके मागावर

'पोल्ट्री उद्योगाला' सरकारकडून पूर्ण सहकार्य देणार! युवकांनी उद्योग-व्यवसायात यावे असे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

Rashi Bhavishya 6 October 2024: कष्टातून मिळणार समृद्धी,पार्टनरशिपमधून होणार सुखाची प्राप्ती; जाणून घ्या कसा असेल तुमचा दिवस

Illegal Fishing: गोव्‍याच्‍या समुद्रात धुडगूस घालणारे ट्रॉलर्स जप्‍त! बेकायदा मासेमारीविरुद्ध मत्स्योद्योग खात्याची कारवाई

SCROLL FOR NEXT