Cow Dainik Gomantak
गोवा

Meghna Cow Missing: ‘मेघना’कुठे गेली! गाय-वासरासाठी मालकाच्या जीवाची घालमेल; फोंडा पोलिस ठाण्यात तक्रार

गोमन्तक डिजिटल टीम

Ponda News: चरण्यासाठी सोडलेली ‘मेघना’ आणि ‘गोदू’ तिच्या वासरासह नाहिशी होते आणि मालकाच्या जीवाची घालमेल होते. नंतर कळते की या दोन्ही गाई आणि छोटे वासरु दाभाळ- निरंकाल येथील गोशाळेत आहेत.

मालक सर्व सोपस्कार पूर्ण करून जेव्हा त्यांना आणायला जातो, त्यावेळेला मेघना तिथेही नसते. त्यामुळे मेघनाचा त्वरित शोध घ्या, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गुरुदास नाईक यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

फोंडा पालिकेने दाभाळ-निरंकाल येथे गोशाळा उभारली असून त्यात सध्या पंचाहत्तरपेक्षा जास्त गुरे आहेत. फोंडा परिसरात रस्त्यावर फिरणाऱ्या गुरांना पकडून या गोशाळेत नेले जाते, एक स्तुत्य उपक्रम फोंडा पालिकेने तेथील सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने केला असला तरी बंद कुंपणातील या गोशाळेतील एक गाय जेव्हा नाहिशी होते, तेव्हा मात्र प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत.

९ जुलै रोजी मेघना आणि गोदू या दोन गाईंसह एक वासरु नाहिसा झाल्याचे लक्षात आल्यावर या गुरांच्या मालकाने त्यांची शोधाशोध केली. शेवटी गोशाळेत ही तिन्ही गुरे आहे असे पाहिल्यावर मालकाचा जीव भांड्यात पडला. त्यानंतर सर्व सोपस्कार पूर्ण करून पशुसंवर्धन खात्याकडे दंडाची रक्कम भरून पावती घेऊन जेव्हा मालक गुरांना आणायला जातो तेव्हा मात्र तीन गुरांपैकी मेघना नावाची एक गाय तेथे नसल्याचे लक्षात येते. याप्रकरणी गोशाळा चालकाने गाय नाहिशी झाल्याचे सांगून हतबलता व्यक्त केल्यावर शेवटी तक्रार फोंडा पोलिसांत करण्यात आली. गोशाळा सचिवाविरुद्ध हलगर्जीपणा केल्याबद्दल ही तक्रार नोंद करण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: त्या घटनेनंतर रात्री झोपही लागत नाही, पीडितेने कोर्टात मांडली व्यथा; आरोपीच्या जामिनाबाबत काय निर्णय दिला?

Goa University: गोवा आणि केरळ विद्यापीठाची खर्चाची तुलना; आकडेवारी काय सांगते?

Rising Vegetable Prices Goa: महागाईने कंंबरडे मोडले; टोमॅटो 80 रुपये किलो, कांदा, लसणाच्या किंमती वाचा

Goa IT Industry: गोव्यात आयटी कंपन्या का येत नाही? साडेआठ हजार कोटींच्या कंपनीचे मालक असलेल्या उद्योजकाने सांगितलं कारण

Goa Todays Live Update: उसगाव येथे बुडालेल्या पाचवीतील मुलाचा मृतदेह अखेर सापडला

SCROLL FOR NEXT