Pramod Sawant  Ivermectin.jpg
Pramod Sawant Ivermectin.jpg 
गोवा

गोवा सरकारने केला तब्बल 22 कोटींचा चुराडा; IVERMECTIN गोळ्यांचे आता काय करणार?

दैनिक गोमंतक

पणजी: केंद्र सरकारने कोविड (Covid-19) उपचारासाठीच्या औषधांच्या यादीतून आयव्हर्मेक्टिन (Ivermectin) गोळ्या हटवल्यामुळे वाटपासाठी खरेदी केलेल्या 22 कोटी 50 लाख रुपयांच्या गोळ्यांचे करायचे काय, हा मोठा प्रश्‍न आता राज्य सरकारसमोर उभा ठाकला आहे. अविचारी पद्धतीने या गोळ्यांची खरेदी केल्याचा आरोप याआधीच काँग्रेसने (Congress) केलेला आहे. त्यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या सरकारने अकारण 22 कोटींचा चुराडा केल्यातच जमा झाला आहे. (Question before the Goa government is what to do with IVERMECTIN pills now)

कोविड प्रतिबंधात्मक उपचार म्हणून या गोळ्या 18 वर्षांवरील नागरिकांना घरोघरी वाटल्या जातील, असे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी जाहीर केले होते. त्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ट्विटरवरून राणे यांच्या ‘हो ला हो’ मिळवले होते. या गोळ्या वाटपासाठी अंगणवाडी सेविकांची मदत घेण्यात येणार होती. हा विभाग राणे यांच्याकडीलच महिला बालकल्याण खात्याच्या अंतर्गत असल्याने सारेकाही जुळवून आणण्यात आले होते. तेवढ्यात त्याची कुणकुण विरोधी कॉंग्रेस पक्षाला लागली. त्यांनी या गोळ्यांच्या वापरास जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता नसल्याचा हवाला देत जनतेच्या आरोग्याशी खेळू नका, असा इशारा दिला होता.

Goa: मान्सून बद्दल महत्वाची बातमी...हवामान खात्याने दिला इशारा

न्यायालयानेही केले होते स्पष्ट
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने गोळ्यांना मान्यता दिल्याने सरकार दरबारी आनंदाचे वातावरण होते. या प्रकरणी अनेकांनी मग मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात धाव घेतली. त्या सुनावणीदरम्यान या गोळ्यांचा वापर कोविड उपचारासाठी करता येईल. मात्र प्रतिबंधात्मक उपाय म्हणून करता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले होते. त्यामुळे सरकारवर या विषयावरून विरोधी पक्षांनी हल्लाबोल केला होता. सरकारने या गोळ्यांच्या खरेदीसाठी निविदा कधी काढली, कोणाकडून या गोळ्या विकत घेतल्या या विरोधकांच्या प्रश्नांवर सरकार निरुत्तर झाले होते. उच्च न्यायालयात १० जून रोजी पुढील सुनावणी होणार असतानाच केंद्र सरकारने या गोळ्या कोविड उपचारातून वगळल्याने आता या २२ कोटी ५० लाख रुपयांच्या गोळ्या सरकारच्या गळ्यात पडल्यातच जमा आहेत.

मुख्यमंत्री खडबडून जागे, सचिवांकडे विचारणा
केंद्रीय आरोग्य महासंचालनालयाने आयव्हर्मेक्टिन गोळ्या वापरास बंदी घातल्यामुळे खडबडून जागे झालेले मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कोविड उपचाराच्या प्रक्रियेतून आयव्हर्मेक्टिन औषध तथा गोळ्या काढण्याबाबत आरोग्य सचिवांकडे तपशील विचारला आहे. गोवा सरकार ‘प्रोफेलेक्सिस’ उपचाराचा एक भाग म्हणून ‘आयव्हर्मेक्टिन,’ औषध वापरत होते. याविषयी मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, कोविड उपचाराच्या प्रक्रियेमधून आयव्हर्मेक्टिन गोळ्या काढण्याबाबत आरोग्य सचिवांकडे आपण तपशील मागितला आहे. हा तपशील मिळताच त्वरित निर्णय घेतला जाईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa BJP: प्रतापसिंह राणे यांचा श्रीपादना पाठिंबा, मी संघाची विचारधारा स्वीकारली; विश्वजीत राणे

Goa Today's Top News : राणेंचा गौप्यस्फोट, लोकसभा, राजकारण, अपघात; राज्यातील ठळक बातम्या एका क्लिकवर

Workers March Goa: पोटावर लाथ मारणारे सरकार हवे कशाला? फार्मा कंपन्यांवरील एस्मा मागे घ्या; पणजीत कामगारांचा एल्गार

Zero Shadow Day: सावली गोमन्तकीयांची साथ सोडणार; राज्यात अनुभवता येणार झिरो शाडो

Goa News: गोव्यात वेश्याव्यवसायिक 12 महिलांना मिळाला मतदानाचा अधिकार

SCROLL FOR NEXT