Police Cup Football Tournament
Police Cup Football Tournament  Dainik Gomantak
गोवा

Police Cup Football Tournament: शापोरा युवक संघाची आगेकूच

दैनिक गोमन्तक

पणजी: शापोरा युवक संघाची 18 व्या पोलिस कप फुटबॉल स्पर्धेतील स्वप्नवत आगेकूच मंगळवारीही कायम राहिली. धेंपो ज्युनियर्सवर 2-1 फरकाने विजय नोंदवून त्यांनी अंतिम फेरीत धडक मारली.

(Police Cup Football Tournament Shapora Youth Team reached the final round)

म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर झालेल्या उपांत्य लढतीत शापोरा युवक संघासाठी पहिल्याच मिनिटास रोहित तोताड याने गोल केला. नंतर 83 व्या मिनिटास राहुल रॉड्रिग्ज याच्या गोलमुळे धेंपो ज्युनियर्सने बरोबरी साधली. 87 व्या मिनिटास मारुती हरिजन याचा गोल शापोरा युवक संघासाठी निर्णायक ठरला. अंतिम फेरीत आता त्यांच्यासमोर सेझा फुटबॉल अकादमीचे आव्हान असेल.

विश्रांतीला शापोरा संघ आघाडीवर

सामना सुरू झाल्यानंतर काही सेकंदातच शापोरा युवक संघाच्या खाती गोलची नोंद झाली. अमर किनळेकरच्या पासवर रोहित तोताडने प्रतिस्पर्धी गोलरक्षकाला चकविले. पिछाडीनंतर धेंपो ज्युनियर्सने आक्रमक खेळाचे धोरण अवलंबविले, पण त्यांना यश लाभले नाही. विश्रांतीला शापोरा संघ 1-0 फरकाने आघाडीवर राहिला.

शेवटच्या टप्प्यात दोन गोल

सामन्याच्या साठाव्या मिनिटास शापोराच्या प्रतीक धारगळकरची, तर 77 व्या मिनिटास धेंपो ज्युनियर्सच्या अनीश गदार याची संधी हुकल्यानंतर अखेरच्या सात मिनिटांचा खेळ बाकी असताना दोन गोल झाले. राहुल रॉड्रिग्जने गोलक्षेत्रात एकाग्रता राखल्यामुळे धेंपो ज्युनियर्सने बरोबरी साधली. मात्र चार मिनिटानंतर प्रतीक धारगळकरच्या शानदार कॉर्नर फटक्यावर मारुतीने शापोराचा विजय निश्चित करणारा गोल केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa BJP: प्रतापसिंह राणे यांचा श्रीपादना पाठिंबा, मी संघाची विचारधारा स्वीकारली; विश्वजीत राणे

Goa Today's Top News : राणेंचा गौप्यस्फोट, लोकसभा, राजकारण, अपघात; राज्यातील ठळक बातम्या एका क्लिकवर

Workers March Goa: पोटावर लाथ मारणारे सरकार हवे कशाला? फार्मा कंपन्यांवरील एस्मा मागे घ्या; पणजीत कामगारांचा एल्गार

Zero Shadow Day: सावली गोमन्तकीयांची साथ सोडणार; राज्यात अनुभवता येणार झिरो शाडो

Goa News: गोव्यात वेश्याव्यवसायिक 12 महिलांना मिळाला मतदानाचा अधिकार

SCROLL FOR NEXT