Revolutionary Goans News, RG News, Viresh Borkar News
Revolutionary Goans News, RG News, Viresh Borkar News Dainik Gomantak
गोवा

अधिवेशनात पोगो विधेयक मांडणारः वीरेश बोरकर

दैनिक गोमन्तक

पणजी : गोमंतकीयांच्‍या हिताचे आणि हक्‍कांचे रक्षण करणारे पोगो व्‍यक्तिगत विधेयक येत्‍या पावसाळी अधिवेशनात मांडणार असल्‍याचे रिव्‍होल्‍युशनरी गोवन्‍स पक्षाचे आमदार वीरेश बोरकर यांनी सांगितले. पक्षाच्‍या येथील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राज्‍यात दिवसेंदिवस बिगर गोमंतकीयांची संख्या वाढत चालली आहे. बहुतांश सर्वच क्षेत्रांत परराज्यांतील लोकांचे प्राबल्‍य वाढत आहे. यामुळे मूळचा गोमंतकीय त्‍याच्‍या हक्‍कापासून वंचित होत आहे. यामुळे गोमंतकीयांच्‍या हिताचे रक्षण करणारे पोगो विधेयक मंजूर होणे काळाची गरज असल्‍याचे बोरकर म्‍हणाले.

या विधेयकाच्‍या प्रती आम्‍ही राज्‍यपाल, खासदार, मुख्यमंत्री आणि सर्व आमदारांना देणार आहोत. हे विधेयक आमच्‍या पक्षाचे नव्‍हे, तर गोमंतकीयांचे आहे, याचा विचार करून सर्व आमदारांनी या विधेयकाच्‍या बाजूने राहावे, असे आवाहन त्‍यांनी केले.

निवडणुकीपूर्वी रिव्‍होल्‍युशनरी गोवन्‍सने निवडून आल्‍यास पोगो व्‍यक्तिगत विधेयक सादर करण्याचे आश्‍वासन गोमंतकीयांना दिले होते. या पार्श्वभूमीवर आम्‍ही हे विधेयक पहिल्‍याच अधिवेशनात सादर करत आहोत.

सर्वपक्षीय आमदारांनी पाठिंबा द्यावा!

गेल्‍या अनेक वर्षांपासून हे विधेयक प्रलंबित आहे. आजवर एकाही आमदाराने हे विधेयक सादर करण्याचा प्रयत्‍न केलेला नाही. म्‍हणूनच गोमंतकीयांना दिलेल्‍या आश्‍वासनानुसार आम्‍ही ते सादर करत आहोत.

सभापतींनी हे विधेयक कामकाजात घ्यावे, तसेच सर्वपक्षीय आमदारांना याला पाठिंबा द्यावा. कारण हे गोमंतकीयांच्‍या भल्‍यासाठी आणि शाश्‍वत भविष्यासाठी महत्त्वाचे आहे, असे बोरकर म्‍हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: पल्लवी धेंपे, सिद्धेश नाईक मंत्री ढवळीकर यांच्याविरोधात काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार

गोवा निवडणूक काळात केजरीवालांचा सेव्हन स्टार हॉटेलमध्ये मुक्काम, कोणी दिले बिल? ED ची कोर्टात माहिती

Goa Petrol-Diesel Price: राज्यातील पेट्रोल-डिझेलच्या किमतीत किंचित बदल; वाचा सविस्तर दर

Jammu and Kashmir: कुलगाममध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत लष्करचा टॉप कमांडर ठार; तीन दहशतवादीही ढेर

Goa Election 2024: दाबोळीत लोकशाहीचा खून, पोलिस संरक्षणात पैसे वाटल्याचा काँग्रेस उमेदवार विरियातोंचा आरोप

SCROLL FOR NEXT