Goa Congress
Goa Congress 
गोवा

Goa Congress: कार्यकर्ते अस्वस्थ, मतदारांच्या मनात संभ्रम; गोव्यातून काँग्रेस नेत्याचे राहुल गांधींना पत्र

गोमंतक ऑनलाईन टीम

Goa Congress

'काँग्रेस पक्ष आपले उमेदवार जाहीर करण्यास जो विलंब लावत आहे, त्यामुळे पक्षातील कार्यकर्ते प्रचंड अस्वस्थ तर झाले आहेतच, शिवाय मतदारांच्या मनातही एकप्रकारचा संभ्रम निर्माण झाला आहे. भाजपला फायदेशीर व्हावे, यासाठीच मुद्दाम हा वेळकाढूपणा केला जात आहे,' असा संशय मतदार व्यक्त करू लागले आहेत.

अशा शब्दांत काँग्रेस पक्षाला मडगावचे काँग्रेस कार्यकर्ते तथा मडगावचे माजी नगराध्यक्ष सावियो कुतिन्हो यांनी घरचा आहेर दिला आहे. ही स्थिती अशीच कायम राहिल्यास काँग्रेससाठी ती मारक ठरू शकेल, अशा स्पष्ट शब्दांत सावियो कुतिन्हो यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पत्र लिहिले आहे.

कार्यकर्ते भाजपच्या गळाला

दक्षिण गोव्यात भाजपने पल्लवी धेंपे यासारख्या उद्योजक घराण्यातील व्यक्तीला उमेदवारी दिली आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात लढत देणे, ही तशी सोपी गोष्ट राहिलेली नाही.

अशा परिस्थितीत भाजप नेते काँग्रेस कार्यकर्त्यांवर दबाव आणत आहेत किंवा त्यांना लालूच दाखवून आपल्याकडे ओढू लागले आहेत. अशा परिस्थितीत काँग्रेसने त्वरित निर्णय घेतला नाही तर ही निवडणूक जड जाऊ शकते, अशी भीती कुतिन्हो यांनी व्यक्त केली आहे.

काँग्रेसने वेळकाढूपणा न करता तात्काळ उमेदवाराची घोषणा करावी, अशी मागणी बाणावलीचे आमदार व्हेंझी व्हिएगस यांनी देखील केली आहे. काँग्रेसने युवा आणि लोकांचे प्रश्न मांडू शकेल असा, उमेदवार जाहीर करावा असेही व्हिएगस म्हणाले.

उमेदवार निवडीसंदर्भात आघाडीसोबत चर्चा झालेली नाही. कोणताही उमेदवार आघाडीतील घटक पक्षावर लादू नये, असे केल्यास वेगळा विचार करावा लागेल असा इशाराही आमदार व्हिएगस यांनी दिला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vegetable Prices Update: राज्यात फळभाज्यांचे दर भडकले, लसूण 320 रुपये किलो; सर्वसामान्यांना महागाईचे चटके

Blue Origin Flight: ऐतिहासिक! राकेश शर्मानंतर गोपीचंद थोटाकुरा ठरले अंतराळात जाणारे दुसरे भारतीय

Holy Spirit Feast In Margao: होली स्पिरिट चर्चच्या फेस्ताची सुरवात; मडगाव पालिकेचे 35 लाख महसुलाचे लक्ष्य

Egg Prices Increased: गोव्यात मासळीपाठोपाठ आता बॉयलर अंड्यांचे भाव गगनाला भिडले; दरातील चढउतार सुरूच

Kushavati River: केपेतील ‘कुशावती’चे पाणी प्रदूषित; ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात!

SCROLL FOR NEXT