paddy
paddy 
गोवा

भात पेरणीची कामे रखडली

Dainik Gomantak

बोरी

कामुर्ली - लोटली भागातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतीची मशागत करून ठेवली असून हे शेतकरी आता पावसाच्या आणि मजुरांच्या प्रतीक्षेत आहेत.
कोविड-१९ टाळेबंदीमुळे या गावात राहणारे परराज्यातील मजूर आपापल्या गावी गेल्यामुळे शेतीची कामे करायला मजूर मिळत नाहीत. कामुर्ली लोटली गावातील झुआरी नदी लगतच्या खाजन शेतीत मशीनद्वारे तसेच खणणी करून नांगरणी करण्यात आली आहे. या खाजन शेतीत पाऊस पडल्यावर शेतीची कामे करता येत नाहीत. म्हणून मॉन्सून सुरू झाल्यावर लगेचच बी पेरणी केली जाते. येथील शेतकऱ्यांना एप्रिल, मे महिन्यात आपल्या शेतीची यंत्राद्वारे नांगरणी करून घेतली, परंतु आता मजूर मिळत नसल्याने बी पेरणे शक्‍य होत नाही. त्यामुळे शेतीत बी पेरण्याचे काम अडून राहिले आहे. आता मजुरांच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa BJP: प्रतापसिंह राणे यांचा श्रीपादना पाठिंबा, मी संघाची विचारधारा स्वीकारली; विश्वजीत राणे

Goa Today's Top News : राणेंचा गौप्यस्फोट, लोकसभा, राजकारण, अपघात; राज्यातील ठळक बातम्या एका क्लिकवर

Workers March Goa: पोटावर लाथ मारणारे सरकार हवे कशाला? फार्मा कंपन्यांवरील एस्मा मागे घ्या; पणजीत कामगारांचा एल्गार

Zero Shadow Day: सावली गोमन्तकीयांची साथ सोडणार; राज्यात अनुभवता येणार झिरो शाडो

Goa News: गोव्यात वेश्याव्यवसायिक 12 महिलांना मिळाला मतदानाचा अधिकार

SCROLL FOR NEXT