New Covid strain Goa to find 602 people who came to Goa from UK UAE since Dec 9
New Covid strain Goa to find 602 people who came to Goa from UK UAE since Dec 9 
गोवा

ब्रिटनची ट्रॅव्‍हल हिस्‍ट्री असलेल्या अकरा कोरोना पॉझिटिव्‍ह रुग्‍णांमुळे गोव्यात खळबळ

गोमन्तक वृत्तसेवा

पणजी :  सध्या नाताळ सण व नव्या वर्षाचे स्वागत करण्याच्या मूडमध्ये लोक असताना त्यांच्या मनात ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्‍या महामारीची भीती निर्माण झाली आहे. राज्यात युकेमधून आलेल्या ९७९ पर्यटकांच्या आरटीपीसीआर कोरोना चाचणीत ११ जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आल्यानंतर लोकांमधील भीती अधिकच वाढली आहे. सध्या या ११ जणांच्या लाळेचे नमुने पुणे येथील व्हायरॉलॉजी लॅबमध्ये अधिक तपासणीसाठी पाठविण्यात आलेले असून त्‍यांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. युकेमधून जे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत त्या लोकांना घरीच आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले. या रुग्णांना ईएसआय किंवा गोवा वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. 

आणखी एक लाख किटची मागणी

आरोग्य खात्यातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात आणखी एक लाख आरटीपीसीआर किटची मागणी करण्यात आली आहे. भविष्यकाळात अधिक चाचण्या कराव्या लागल्या तर किटची कमी पडू नये म्हणून ही काळजी घेण्यात आल्याची माहिती मिळाली. दरम्यान आजच्या दिवशी एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला असून यामुळे राज्यात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या ७२८ झाली आहे. राज्यातील रिकव्हरी रेट म्हणजे बरे रुग्ण बरे होण्याचा दर ९६.५७ टक्के इतका आहे. आज दिवसभरात ९० लोकांना कोरोनाची लागण झाली तर ८८ लोक कोरोनमुक्त झाले आहेत. राज्यभरात एक हजार एक इतके कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. आज ६२ लोकांनी होम आयसोलेशनचा मार्ग उपचारासाठी स्वीकारला तर इस्पितळात उपचार करण्यासाठी १९ लोकांना भरती करून घेण्यात आले. १६७७ इतक्या कोरोना पडताळणी चाचण्या करण्यात आल्या.

युकेतून आलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांना वेगळा कक्ष

ब्रिटनमधून आलेल्या आणि कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांना ईएसआय इस्पितळात स्वतंत्र कक्षात ठेवण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी एका खासगी माध्यम संस्थेला दिली. यासंदर्भातील खातरजमा करण्यासाठी आम्ही मंत्री राणे यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, संपर्क होऊ शकला नाही. याशिवाय एसओपीप्रमाणे पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांची लाळ पुण्यातील व्हायरॉलॉजी लॅबमध्ये पुढील चाचणीसाठी पाठविण्यात आल्याचेही ते म्हणाले. 

कोरोना लसीकरणासाठी कृती दलाची नियुक्ती  

कोरोनाच्या लसीकरणाबाबत राज्यात हालचाली सुरू झाल्या असून राज्यात लसीकरण नियोजनासाठी कृती दलाची स्थापना म्हणजेच ब्लॉक टास्क फोर्सची नियुक्ती करण्यासाठीचा नियम गोवा सरकारने जारी केला आहे. या दलांमध्ये नॅशनल कॅडेट कोअर (एनसीसी), नेहरू युवा केंद्र संघटन (एनवायकेएस) आणि नॅशनल सर्व्हिस स्कीम (एनएसएस) मधील तरुणांचासुद्धा समावेश असणार आहे.

"राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रात्रीची संचारबंदी लागू करण्याबाबत अद्याप तरी विचार नाही. कारण, तशा प्रकारची काही मार्गदर्शक तत्त्‍वे केंद्राकडून आलेली नाहीत. गेल्या आठ दिवसांत राज्यात जी विमाने युके येथून आली आहेत, त्या विमांनातून आलेल्या प्रवाशांना घरी विलगीकृत होण्यासाठीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शिवाय जे लोक पॉझिटिव्ह आले आहेत, त्यांच्या लाळेचे नमुने एसओपीप्रमाणे पुण्याला पाठविण्यात आले आहेत. जे लोक युकेतून आले आहेत त्यांच्याशी आमचे बोलणे सुरू असून आम्ही त्यांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत."
- डॉ. प्रमोद सावंत, मुख्‍यमंत्री

नव्या विषाणूचा प्रसार झाला तर पुढे काय?

लोकांच्यात या नव्या विषाणूबद्दल मोठ्या प्रमाणात भीती आहे. यापूर्वी एका रुग्णामुळे ग्रीन झोन झालेला गोवा पुन्हा कोरोनाच्या विळख्यात अडकला होता, आतासुद्धा तेच होणार का? आणि जर पुन्हा असे झाले तर आम्ही काय करायचे? असा प्रश्न सोशल मीडियाच्या माध्यमातून लोक विचारत आहेत. पुन्हा एकदा राज्याला संकटात टाकण्यापूर्वी योग्य ती पावले सरकारने उचलायला हवीत, अशी मागणीसुद्धा लोकांकरवी केली जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Externment Orders: पास्टर डॉम्निक डिसोझा आणि जुआन मास्करारेन्हसला दिलासा; तडीपारीचा आदेश रद्द

Catholic Wedding: कॅथलिक समाजासाठी विवाहाची वेळ रात्री 12 पर्यंत वाढवावी; चर्चिल आलेमाव यांची मागणी

Cashew Fest Goa 2024: हुर्राक, फेणी, काजूचे पदार्थ, लाईव्ह म्युझिक आणि बरेच काही; शुक्रवारपासून गोव्यात काजू महोत्सव

कोर्टात 13 महिन्यांच्या मुलाला फरशीवर फेकले; महिलेविरुद्धचा FIR रद्द करण्यास न्यायाधीशांचा नकार

Goa Today's Live News: गोव्यातील दोन्ही जागा भाजपच जिंकणार - मुख्यमंत्री डॉ. सावंत

SCROLL FOR NEXT