Jagadish Jairam Shet Verekar passed away  
गोवा

Jagadish Jairam Shet Verekar: मराठी तथा कोकणी रंगभूमी गाजवणारे ज्येष्ठ रंगकर्मी जगदीश जयराम शेट वेरेकर यांची प्राणज्योत मालवली!

गोमन्तक डिजिटल टीम

फोंडा येथील ज्येष्ठ रंगकर्मी तथा उद्योजक जगदीश जयराम शेट वेरेकर (८०) यांचे गुरुवारी अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात भाऊ, बहीण, दोन मुलगे, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

वेरेकर यांनी जवळजवळ पन्नास वर्षे मराठी तथा कोकणी रंगभूमी गाजवली. अनके मराठी तसेच कोकणी नाटकातील त्यांच्या भूमिका प्रेक्षकप्रिय ठरल्या होत्या. सिने क्षेत्रातही त्यांनी आपला दबदबा निर्माण केला होता. त्यांच्या निधनाची बातमी कळताच अंत्रुज महालातील अनेक कलाकारांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. नाट्य क्षेत्रात पोकळी झाल्याची भावना कलाकारांनी व्यक्त केली.

अष्टपैलू कलाकार: म्हाडगुत

जगदीश वेरेकर हे एक अष्टपैलू कलाकार होते. नाट्यशेत्र बरोबर त्यांनी सिने क्षेत्रही गाजविले होते. माझ्या चार चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या होत्या. जीव ओतून काम करणे, त्याचबरोबर दिलेली भूमिका दिग्दर्शकाच्या सूचनेप्रमाणे वठवणे या त्यांच्या गुणामुळेच ते लोकप्रिय होऊ शकले. या महान कलाकाराच्या जाण्यामुळे एक पोकळी तयार झाली आहे, अशा शब्दात सिनेनिर्माते दिग्दर्शक तथा लेखक मिलिंद म्हाडगुत यांनी आदरांजली अर्पण केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Accident: उतारावरुन जाताना कदंब बसचा ब्रेक झाला फेल, भीषण अपघातात 10 प्रवासी थोडक्यात बचावले

Goa Today's News Live: कुडचडेत बाजारात अपघात, कारची पाच वाहनांना धडक

Yuri Alemao: 'गोव्यातील जातीय सलोखा बिघडवण्याचं काम सुरु, गोमंतकीयांची खरी ओळख...'; आलेमाव स्पष्टच बोलले

Big Boss Marathi: गोव्याच्या वंडरगर्लची बिग बॉसमधून एक्झिट! भावूक पोस्ट करत म्हणाली...

Saint Estevam Accident: बाशुदेवप्रकरणी गुंता वाढला! कारमधील व्यक्तीला पाहिलेच नाही; पाठलाग करणाऱ्या तरुणांनी बदलली जबानी

SCROLL FOR NEXT