Football Cup
Football Cup  Dainik Gomantak
गोवा

पणजी फुटबॉलर्सच्या विजयात इरफानची 'हॅटट्रिक'

दैनिक गोमन्तक

पणजी: इरफान यादवाड याच्या हॅटट्रिकच्या बळावर गोवा पोलिस कप फुटबॉल (Goa Police Cup Football) स्पर्धेत पणजी फुटबॉलर्सने मार्नाच्या सेंट सेबॅस्तियन स्पोर्टस क्लबचा 5-0 फरकाने धुव्वा उडविला. सामना सोमवारी म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर झाला. सामन्याच्या पूर्वार्धात पणजी फुटबॉलर्स संघ 2-0 फराने आघाडीवर होता. सामन्याच्या 65 व्या मिनिटास रेफरीने धोकादायक खेळाबद्दल पणजी फुटबॉलर्सच्या फ्रँकी ओलिव्हेरा याला थेट रेड कार्ड दाखविण्यात आले. एक खेळाडू कमी होऊनही त्याचा परिणाम पणजी फुटबॉलर्सच्या वर्चस्वावर झाला नाही. त्यांनी थाटात उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

पणजी फुटबॉलर्सच्या विजयात इरफान यादवाडच्या तीन गोलव्यतिरिक्त चंदन गावस व जॉयसन गांवकार यांनी प्रत्येकी एक गोल केला. चंदनने संघाचा पहिला गोल 22 व्या मिनिटास केला, नंतर इरफानने 33 व्या मिनिटास पणजी संघाची आघाडी वाढविली. 46 व्या मिनिटास इरफान सामन्यातील वैयक्तिक दुसरा गोल केला. 81 व्या मिनिटास जॉयसन याने पणजी फुटबॉलर्सची आघाडी 4-0 अशी भक्कम केली. सामन्याच्या 90+1 व्या मिनिटास इरफानने हॅटट्रिकचा मान मिळवत संघाच्या मोठ्या विजयावर शिक्कामोर्तब केले. इरफान सामन्याचा मानकरी ठरला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa BJP: प्रतापसिंह राणे यांचा श्रीपादना पाठिंबा, मी संघाची विचारधारा स्वीकारली; विश्वजीत राणे

Goa Today's Top News : राणेंचा गौप्यस्फोट, लोकसभा, राजकारण, अपघात; राज्यातील ठळक बातम्या एका क्लिकवर

Workers March Goa: पोटावर लाथ मारणारे सरकार हवे कशाला? फार्मा कंपन्यांवरील एस्मा मागे घ्या; पणजीत कामगारांचा एल्गार

Zero Shadow Day: सावली गोमन्तकीयांची साथ सोडणार; राज्यात अनुभवता येणार झिरो शाडो

Goa News: गोव्यात वेश्याव्यवसायिक 12 महिलांना मिळाला मतदानाचा अधिकार

SCROLL FOR NEXT