Goa Today's 29 March 2024 Live News Update Breakings| Goa Liquor Scam
Goa Today's 29 March 2024 Live News Update Breakings| Goa Liquor Scam Dainik Gomantak
गोवा

Goa Today's Live News: दिवसभरातील घडामोडींचा आढावा घ्या एका क्लिकवर

Pramod Yadav

कर्नाटक येथून गोवा बनावटीच्या दारूसह 10.60 लाखांचा मुद्देमाल जप्त

लक्ष्मीनगर-हिंडलगा (कर्नाटक) येथून गोवा बनावटीच्या दारूसह 10.60 लाखांचा मुद्देमाल जप्त. 41 वर्षांच्या संशयिताला अटक. NCB पथकाची कारवाई

भंडारी समाजाला गृहित धरू नये - राजेश कळंगुटकर

Goa AAP

गोव्यात काल 4 जणांची झालेली ED ची चौकशी ही निव्वळ भंडारी समाजाची सतावणूक करण्याचे कारस्थान आहे.

भंडारी समाज हा गरीब व कष्टाळू आहे कुणीही या समाजाला गृहित धरू नये नाहीतर हा समाज बऱ्या बऱ्या प्रस्थापितांना स्वहा करेल असे आप चे नेते राजेश कळंगुटकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले

Goa AAP

डिचोलीत ख्रिश्चन बांधवांनी पाळला 'गुड फ्रायडे'

Good Friday In Goa

डिचोलीत ख्रिश्चन बांधवांनी पाळला 'गुड फ्रायडे'. एकतेचा संदेश देत शहरात काढली मिरवणूक.

Good Friday In Goa

मार्ना-शिवोलीत व्हिलामध्ये 15 लाखांची चोरी

मार्ना-शिवोलीतील व्हिलामध्ये 11.61 लाखांचे सोन्याचे दागिने आणि 3.15 लाखांची रोकड अशी एकूण 14.76 लाख रुपयांची चोरी झाली आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.

मडगाव रेल्वे स्थानकाजवळ बेवारस पिशवीत आढळली नऊ हजारांची दारू

Margao Railway Station

मडगाव रेल्वे स्थानकाजवळ एका हॉटेलसमोर बेवारस पिशवीत आढळली नऊ हजारांची दारू. मडगाव पोलिसांकडून दारुच्या बाटल्या जप्त. पोलिसांच्या भीतीने कोणीतरी पिशवी तिथेच सोडून गेल्याचा प्राथमिक अंदाज.

जप्त केलेल्या पैशांशी निगडीत तक्रार निवारणासाठी दक्षिण गोव्यात समिती

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. दरम्यान, याकाळात बेकायदेशीर मोठी रक्कम जवळ बाळगल्यास कारवाई केली जाते. याबाबत तक्रारी निवारणासाठी दक्षिण गोवा जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी अश्विन चंद्रू ए. यांनी त्रिसदस्यीय समिती स्थापन केली आहे.

नगरगावात रविवारी आठ तास वीजपुरवठा खंडित राहणार 

नगरगाव येथे केबल बदलण्याचे काम सुरू असल्यामुळे रविवारी (दि. 31 मार्च) सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे.

Goa Electricity

पालिये - केरी रस्त्याच्या मधोमध फेकला कचरा

पालिये - केरी येथे अज्ञात व्यक्तीने रात्री उशीरा रस्त्याच्या मधोमध फेकला कचरा. या फेकलेल्या कचऱ्यामुळे रस्त्यावर सर्वत्र घाण आणि दुर्गंधीमुळे प्रवाशांना होतोय त्रास. कचरा टाकणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू

दुर्भाट-फोंडा येथील साई बाबा मंदिरात चोरी

दुर्भाट-फोंडा येथील साई बाबा मंदिरात चोरट्यांनी फंडपेटी फोडून सुमारे 50 हजार रुपये लंपास केले आहेत. पोलिस अधिक तपास करत आहेत.

दवर्ली येथे पाण्याची मुख्य पाइपलाइन फुटली

दवर्ली येथे पाण्याची मुख्य पाइपलाइन फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया. जलसंपदा विभागाअंतर्गत नाल्याच्या काठावर संरक्षक भिंत बांधताना पाइपलाइन फुटल्याची माहिती समोर आली आहे.

गिरी येथे सापडला मानवी सांगाडा

Gurim Mapusa

सर्वेवाडा, गिरी येथे शेतात सापडला मानवी सांगाडा. म्हापसा पोलिसांनी केला पंचनामा. अधिक तपास सुरू.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Session Court: वेश्याव्यवसाय प्रकरणी दोषी ठरलेल्या विजय सिंग याला गुरुवारी ठोठावली जाणार शिक्षा

Canacona: तपासणी टाळण्यासाठी समुद्रातून मद्य तस्करी; काणकोण येथे एकाला अटक

Goa SSC Result Declared: यंदाही मुलीच हुश्शार, गोव्यात दहावीचा 92.38 टक्के निकाल

Xeldem Assault Case: आंब्यावरुन मारहाण, सोनफातर - शेल्‍डे येथे बागमालकास जीवे मारण्याची धमकी

Goa Today's Top News: दहावीचा निकाल, अपघात, चिरे खाणीवर छापा; गोव्यातील बातम्यांचा आढावा

SCROLL FOR NEXT