Goa Rain Updates | Goa Weather News
Goa Rain Updates | Goa Weather News Dainik Gomantak
गोवा

Goa Rain Updates : गोव्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

आदित्य जोशी

पणजी : कर्नाटकच्या उत्तर आणि दक्षिण भागात ट्रफ्स आणि पूर्वेकडील वाऱ्यांमुळे राज्यात शुक्रवारी काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याच्या वेधशाळेने वर्तविली आहे. त्यामुळे गोव्यात पुन्हा पावसाचं दमदार आगमन होण्याची शक्यता आहे.

यंदाच्या मॉन्सूननंतर मेघगर्जनेसह पाऊस बसरण्याची ही पहिलीच वेळ असेल. आज शुक्रवारी, (29 जुलै) जरी पाऊस मोठ्या प्रमाणात बरसणार नसला तरी काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा पावसाला सुरुवात होणार असल्याचे राहुल यांनी सांगितले.

गेल्या 24 तासांत राज्यात केवळ 1.9 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. मॉन्सूनच्या आगमनानंतर एका दिवसात पडणारा हा सर्वांत कमी पाऊस आहे. आतापर्यंत राज्यात एकूण 2012.8 मिलीमीटर म्हणजेच 79.24 इंच पावसाची नोंद झाली आहे, जी सरासरी पावसाच्या तुलनेत 7.8 टक्के अधिक आहे.

एकदा मॉन्सूनला सुरुवात झाली, की विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना होत नाही. मात्र, ज्यावेळी दीर्घकाळ कमी प्रमाणात पाऊस पडतो किंवा पाऊसच पडत नाही, अशावेळी जेव्हा पुन्हा नव्याने पाऊस सुरू होतो, त्यावेळी मेघगर्जना होते. मागील तीन वर्षांत मॉन्सून प्रारंभानंतर मेघगर्जना झालेली नाही, अशी माहिती एम. राहुल यांनी दिली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

Goa Today's Live News: चारशे नव्हे दोनशे पार देखील भाजपला जड जाणार - शशी थरुर

United Nations मध्ये भारताचा अमेरिका आणि इस्रायलला दणका; स्वतंत्र पॅलेस्टाईनच्या मागणीला दिला पाठिंबा

SCROLL FOR NEXT