Goa Forward Party opposes Goa Universitys offline examination system
Goa Forward Party opposes Goa Universitys offline examination system 
गोवा

गोवा विद्यापीठाची ऑफलाईन परीक्षा नको : जीएफपी

दैनिक गोमन्तक

पणजी : गोवा विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होतील, असे जाहीर केले आहे. त्यास गोवा फॉरवर्ड पक्षाच्या युवा शाखेने विरोध केला आहे. याप्रसंगी रूणाल केरकर व इतर मान्यवर उपस्थित होते. 


केरकर म्हणाले की, विद्यापीठाने तृतीय वर्षाच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेणार असल्याचे जाहीर केले आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे वाहन नाही, त्या विद्यार्थ्यांना सार्वजनिक बसेसचा वापर करावा लागणार आहे. जर एखाद्या विद्यार्थ्याला कोरोनाची लागण झाली, तर त्याच्यासह त्याचे कुटुंबही अडचणीत येऊ शकते. जे विद्यार्थी पुनर्परीक्षा देण्यासाठी परराज्यातून येणार आहेत, ते आपले एक किंवा दोन पेपर देऊन निघून जातील. परंतु त्यांच्या माध्यमातून येथील विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह झाल्यास त्याला जबाबदार कोण, असा सवालही त्यांनी केला. 

आणखी वाचा:


अंतिम वर्षासाठी असलेल्या पाच पेपरपैकी एका पेपरला परराज्यातील विद्यार्थी येणार आणि परीक्षा देणारे विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळले, तर त्याच्या उर्वरित परीक्षेचे काय? परीक्षा काळात विद्यार्थ्यास काय झाले तर त्याची हमी विद्यापीठ घेणार नाही, असे त्यांनी जाहीर केले आहे. म्हणजे विद्यापीठ त्यातून अंग काढून घेत आहे. विद्यापीठाने ऑफलाईन परीक्षेविषयी विचार करावा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Session Court: वेश्याव्यवसाय प्रकरणी दोषी ठरलेल्या विजय सिंग याला गुरुवारी ठोठावली जाणार शिक्षा

Canacona: तपासणी टाळण्यासाठी समुद्रातून मद्य तस्करी; काणकोण येथे एकाला अटक

Goa SSC Result Declared: यंदाही मुलीच हुश्शार, गोव्यात दहावीचा 92.38 टक्के निकाल

Xeldem Assault Case: आंब्यावरुन मारहाण, सोनफातर - शेल्‍डे येथे बागमालकास जीवे मारण्याची धमकी

Goa Today's Top News: दहावीचा निकाल, अपघात, चिरे खाणीवर छापा; गोव्यातील बातम्यांचा आढावा

SCROLL FOR NEXT