Amit Patkar News | Goa Congress News Dainik Gomantak
गोवा

Goa Congress : विरोधी पक्षनेता निवड गणेश चतुर्थीनंतर

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Congress : काँग्रेस विधीमंडळ नेता निवड साधारणतः गणेश चतुर्थीनंतर होईल, अशी शक्यता प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी व्यक्त केली. सध्या पक्षाचे सर्व नेते राष्ट्रीय पातळीवरील आंदोलनाच्या नियोजनात सक्रिय आहेत. त्यामुळे त्यांची बैठक झाल्यानंतरच ही निवड होईल, असे त्यांनी सांगितले.

काँग्रेस भवनात आयोजित कार्यक्रमानंतर विधीमंडळ नेता निवडीला झालेल्या विलंबाविषयी विचारणा केली असता पाटकर म्हणाले, की विधी मंडळ नेता निवडीसाठी गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव, मुकल वासनिक, सोनिया गांधी या सर्वांची बैठक होणे गरजेचे आहे. सध्या ही सर्व मंडळी महागाईविरोधात देशभर काँग्रेस पक्ष जे आंदोलन करणार आहे, त्याच्या नियोजनाला लागले आहेत. त्यामुळे साधारणतः गणेशोत्सवानंतरच ही बैठक होईल असे दिसते. काही आमदारांनी आपली विरोधी पक्ष नेता होण्याची तयारी दर्शविली आहे.

विरोधी पक्षनेतेपद तांत्रिकदृष्ट्या मायकल लोबो यांच्याकडे आहे, तर मायकल लोबो यांना अपात्र ठरवावे, असा विनंती अर्ज प्रदेशाध्यक्ष पाटकर यांनी सभापती रमेश तवडकर यांना दिला आहे. विधानसभेचे कामकाज सुरू होते, तेव्हा मायकल लोबो आणि दिगंबर कामत यांना पक्षविरोधी कारवाया केल्याने त्यांना अपात्र ठरवावे, म्हणून अर्ज देण्यात आला आहे. सभापती तवडकर यांनी अद्याप या अर्जावर निर्णय घेतलेला नाही. त्यामुळ लोबो यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपद तांत्रिकदृष्ट्या राहिले आहे. विधानसभा कामकाज संपल्यानंतर या याचिकांवर निर्णय होईल व विरोधी पक्षनेताही निवडला जाईल, असे वाटत होते. परंतु तसे काहीच झाले नाही.

आलेक्स सिक्वेरा यांच्या नावाला पसंती

विरोधी पक्षनेतेपद स्वीकारण्याची आमदार संकल्प आमोणकर व युरी आलेमाव या दोन आमदारांनी इच्छा व्यक्त केली आहे, परंतु काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ नेते आलेक्स सिक्वेरा यांना ते पद देण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र, त्यांच्या वयाचा विचार करता त्यांच्याकडे ते पद दिले जाईल, अशी शक्यता कमी वाटते. त्याशिवाय जे काही आमदार आहेत, त्यांना एकत्रित ठेवण्याची कसरत पेलण्याची क्षमता ज्याच्यामध्ये आहे, त्यालाच हे पद दिले जाईल, असे पक्षातील ज्येष्ठ नेत्यांचे म्हणणे आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'गोवा पोलिस' अंमलीपदार्थांविरोधी गंभीर! 'कोकेन जप्ती'प्रकरणी दिल्ली पोलिसांना करणार सहकार्य

Sunburn Festival 2024: धार्मिक स्थळी 'असले' कार्यक्रम नकोच! 'सनबर्न' साठीच्या सभेनंतर ग्रामस्थ ठरवणार दिशा

Israel-Iran War: इस्रायल-इराण युद्धानं सर्वसामान्यांचं बजेट कोलमडणार! भारतासह जगभरातील देशांना बसणार फटका

वेलिंगकरप्रकरणी 'लुकआऊट नोटीस' जारी! हिंदुत्ववादी संघटनांचे समर्थन; पोलिसांची पथके मागावर

Rashi Bhavishya 6 October 2024: या राशीच्या लोकांनी आज रहावे सावध! जाणून घ्या कसा असेल तुमचा दिवस

SCROLL FOR NEXT