Global Konkani Forum  Dainik Gomantak
गोवा

Romi Konkani: ‘रोमी कोकणी’ समर्थकांच्या मोर्चाला अल्प प्रतिसाद; साहित्य अकादमीची दिशाभूल केल्याचा आरोप

Global Konkani Forum Protest: मडगावच्या रवींद्र भवनात आजपासून सुरू झालेल्‍या अखिल भारतीय कोकणी परिषदेच्या अधिवेशनाला सुरवात झाली खरी, मात्र ग्लोबल कोकणी फोरमतर्फे रवींद्र भवनाबाहेर रोमी कोकणीला राजभाषा दर्जा देण्याची व रोमी कोकणी शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्‍याची मागणी करून मूक मोर्चा काढला.

गोमन्तक डिजिटल टीम

सासष्टी: मडगावच्या रवींद्र भवनात आजपासून सुरू झालेल्‍या अखिल भारतीय कोकणी परिषदेच्या अधिवेशनाला सुरवात झाली खरी, मात्र ग्लोबल कोकणी फोरमतर्फे रवींद्र भवनाबाहेर रोमी कोकणीला राजभाषा दर्जा देण्याची व रोमी कोकणी शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्‍याची मागणी करून मूक मोर्चा काढला. मात्र या मोर्चाला अल्प प्रतिसाद लाभला.

रवींद्र भवनात अखिल भारतीय कोकणी परिषदेच्या अधिवेशनाला सुरवात झाली. तद्‌नंतर मडगावच्या लोहिया मैदानावर आयोजित खुल्या सत्रालाही अल्‍प प्रतिसाद मिळाला. विशेष म्‍हणजे दोन्‍ही ठिकाणी १०० लोकसुद्धा उपस्‍थित नव्‍हते.

या अधिवशानाला आमचा विरोध असल्याचे फोरमचे अध्यक्ष कॅनेडी आफोन्‍सो यांनी सांगितले. ते म्हणाले की, कोकणी साहित्य परिषदेने साहित्य अकादमीची दिशाभूल केली असल्याने इतर लिपींना त्याचा परिणाम भोगावा लागत आहे. गोव्यात ३३ टक्के ख्रिश्‍‍चन समाज रोमी लिपिचा वापर करत आहे. त्यांच्या भावना व आकांक्षांचा आदर झाला पाहिजे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

रशिया - युक्रेन युद्ध आंतरराष्ट्रीय शांततेसाठी मोठा धोका; जर्मन चान्सलर स्कोल्झ यांचे गोव्यात वक्तव्य

Manohar International Airport: मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर बॉम्बच्या धमकीचा कॉल आल्याने खळबळ!

Goa Crime: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून 15 लाखांचा गंडा घालणाऱ्या पोलिसाला अटक; फोंड्यातील घटना

Goa Live Updates: भूतानी प्रकल्पाविरुद्धच्या आंदोलनाला गोवा फॉरवर्ड पक्षाचा पाठिंबा!

गोव्यातील युवकांना दर्जेदार रोजगार न मिळणे हा तर टिकटिकणारा 'टाइमबॉम्ब'!

SCROLL FOR NEXT