Mohandas Lolienkar|Cleofato Coutinho Dainik Gomantak
गोवा

Ganthvol: गोव्याच्या प्रेरणादायी विद्यार्थी चळवळीचा इतिहास ‘गांठवल’मधून उलगडणार

गोमन्तक डिजिटल टीम

काणकोण: गोव्याची ऐतिहासिक विद्यार्थी चळवळीचा इतिहास ‘गांठवल’ या मालिका कार्यक्रमातून उलगडणार आहे. लोलये येथील मनोशोभा कलाघर सांस्कृतिक केंद्रातर्फे पलाश अग्नी स्टुडिओजच्या संयुक्त विद्यमाने या मालिका कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या मालिकेतील पहिला कार्यक्रम शनिवारी (ता.२८) संध्या. ४ वाजता संदेश प्रभुदेसाई यांच्या आगस-लोलये येथील निवासस्थानी होणार आहे.

विद्यार्थी चळवळ पन्नास टक्के बस सवलत‌ व गोमेकॉ प्रवेश गौडबंगाल यातून सुरूवात झाली. १९७० आणि ८० च्या दशकांतील गोव्याच्या प्रेरणादायी चळवळीचा लेखाजोगा तत्कालीन विद्यार्थी पुढारी उलगडणार आहेत. विद्यार्थी आंदोलनाबरोबरच साहित्य, विद्यार्थी मासिक, रस्ता नाट्य चळवळ, गावशिबिरे, समाज कल्याण अशा विविध कार्यक्रमांविषयी त्या काळातील विद्यार्थी कार्यकर्ते अनुभव कथन करतील.

१९७८ मध्ये पन्नास टक्के बस सवलत आंदोलनाचे नेतृत्व केलेले विद्यार्थी पुढारी मोहनदास लोलयेकर यावेळी अनुभवकथन करतील. लोलयेकर आज एक यशस्वी उद्योजक असून राजकारणातही सक्रिय आहेत. लोलये-पोळे गावचे सरपंच म्हणून त्यांची कारकीर्द गाजलेली आहे.

यावेळी पन्नास टक्के बस सवलतीवरील कार्यक्रमाचे संचलन पणजीच्या व्ही एम. एस. कायदा महाविद्यालयाचे विद्यार्थी संकल्प गांवकर करतील. तसेच गोमेकॉ गौडबंगाल आंदोलनावरील कार्यक्रमाचे संचालन मडगावच्या चौगुले महाविद्यालयातील समाजशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. सचिन मोरायस करतील. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून युवा वर्गाने खास करून विद्यार्थीवर्गाने मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन सुदेश प्रभुदेसाई यांनी केले आहे.

अॅड. क्लिओफात मांडणार गोमेकॉतील गौडबंगाल

गोमेकॉतील तीन राखीव जागा व प्रवेशासाठी आपल्या पुतणीचे मार्क वाढविणारे तत्कालीन शिक्षणमंत्री फ्रांसिस्को सार्दिन यांच्या विरोधात झालेल्या संयुक्त आंदोलनांचे नेतृत्व केलेले अॅड. क्लिओफात आल्मेदा कुतिन्हो यांनी केले होते. ते या आंदोलनांचा लेखाजोगा सादर करतील. त्यावेळी अखिल गोवा विद्यार्थी संघटनेचे सरचिटणीस असलेले अॅड. आल्मेदा हे वरिष्ठ वकील व माजी न्यायाधीश आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: दरमहा सात हजार! पगार की शिक्षा? शिक्षकांना देण्यासाठी भाजप सरकारकडे नाहीत पैसे; काँग्रेस

Goa Today's News Live: दक्षिण गोव्यातील स्विगी डिलिव्हरी बॉईज संपावर

Pramod Sawant: दक्षिणेतील काही राज्य हिंदी समजून देखील घेण्याचा प्रयत्न करत नाहीत; गोवा मुख्यमंत्री

एक देश-एक निवडणूक! प्रत्यक्षात येण्याची वाट कमालीची खडतर; संपादकीय

गोव्याच्या लोकसंस्कृतीत 'घुमट वाद्याला' अनन्यसाधारण स्थान का आहे? चर्मवाद्यांच्या विशेष योगदानाबद्द्ल जाणून घ्या!

SCROLL FOR NEXT