traffic panjim.jpg
traffic panjim.jpg 
गोवा

पणजीत परवाण्याशिवाय सुरू असलेल्या खोदकामामुळे वाहतुकीचा बट्ट्याबोळ

दैनिक गोमन्तक

पणजी: खोदकामासाठी (Excavation) कोणताही परवाना (Permission) न घेता सार्वजनिक बांधकाम विभागाने नव्या पाटो पुलापासून जवळील गटाराच्या बांधकामासाठी रस्ता मधोमध खोदला. त्यामुळे सोमवारी सकाळी वाहतुकीची कोंडी झाली होती. वाहतूक (Traffic) पर्यायी रस्त्याने वळविली तरी वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. उल्लेखनीय म्हणजे, या कामाबाबबत वाहतूक पोलिस तसेच पणजी महापालिकेलाही कल्पना दिली गेली नाही. त्यामुळे लोकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. (Excavation without permission in Panaji is a problem for traffic in Panjim) 

सोमवारी पणजीत (Panjim) येणाऱ्या वाहनांची संख्या मोठी असते. त्यातच रस्ता मधोमध खोदून ठेवला गेल्याने पणजीत प्रवेश करणाऱ्या वाहनचालकांची धांदल उडाली. नव्या पाटो पुलाच्या ठिकाणी पणजीत येणारी वाहने पणजी रेसिडन्सी येथून वळविण्यात आली. वाहनांच्या रांगा या पुलापासून दिवजा सर्कल तसेच मेरशी सर्कलपर्यंत लागल्या होत्या. या खोदकामाबाबत आगाऊ सूचना वाहतूक पोलिसांना दिली नव्हती. त्यानंतर, मात्र वाहने वळविण्यासाठी त्यांना मोठी कसरत करावी लागले.
पर्यटकांसाठी खुशखबर: उद्यापासून उघडणार ऐतिहासिक स्मारकांचे दरवाजे 

परवानगी नाही:  महापौर 
पाणी निचरा करणाऱ्या गटाराचे बांधकाम मोडल्याने त्याच्या डागडुजीसाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने हे खोदकाम केले आहे. हे काम करण्यासाठी खात्याने महापालिकेकडे परवानगी मागितली होती मात्र ती देण्यात आली नव्हती. पावसाळ्यात पणजीत पाणी साचत असल्याने या गटाराचे बांधकाम करणेही महत्त्वाचे होते त्यामुळे महापालिकेनेही त्याला हरकत घेतली नसल्याचे महापौर रोहित मोन्सेरात यांनी सांगितले. 

कल्पना दिली नाही: शेख 
पणजीत मुख्य रस्त्यावरील खोदकामाबाबत कोणतीच कल्पना सार्वजनिक बांधकाम खाते व पणजी महापालिकेने दिली नव्हती. रविवारपासून हे खोदकाम सुरू आहे मात्र हा सुट्टीचा दिवस असल्याने वाहतुकीची कोंडी जाणवली नाही.  सोमवारी मात्र कर्मचारी वाहने घेऊन पणजीत येत असतात. कोडींची माहिती मिळताच वाहतूक पोलिस त्या ठिकाणी तैनात करून ही कोंडी सोडवण्यात आली, अशी माहिती उपअधीक्षक सलीम शेख यांनी दिली. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : सावर्डेतून भाजपला मिळवून देणार २० हजार मताधिक्‍य; भाजप मंडळाची ग्‍वाही

Panaji News : विरोधकांनी स्वप्नेच पहावी! बाबूश मोन्सेरात

Congress News : काँग्रेसच्या दिग्गजांची पाठ; विराट सभांना फाटा

Panaji News : पणजीत पोर्तुगीजकालीन नाल्यांची सफाई

Goa Dam : पावसाळ्यापर्यंत राज्यात पाणीटंचाईची शक्यता नाही; धरणांमध्ये पुरेसा जलसाठा

SCROLL FOR NEXT