Mauvin Gudinho on Panchayat Election
Mauvin Gudinho on Panchayat Election Dainik Gomantak
गोवा

पंचायत निवडणुका 4 जूनला घेण्याचा प्रस्ताव : मंत्री मॉविन गुदिन्हो

दैनिक गोमन्तक

पणजी : राज्यातील 186 पंचायतींची मुदत जूनच्या दुसऱ्या आठवड्यात संपत असल्याने गोवा राज्य निवडणक आयोगाने निवडणुका 4 जूनला घेण्याचा प्रस्ताव पाठवला आहे. सरकारचीही त्याला सहमती आहे. पंचायतीसाठी पुरेसे आरक्षण देण्यात आल्याने आरक्षणासाठी प्रभागाच्या संख्येत वाढ अशक्य असल्याची माहिती पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी दिली आहे. (Goa Election commission to conduct panchayat Election in June says mauvin gudinho News Updates)

राज्य निवडणूक आयोगातर्फे प्रभाग फेररचनेचे काम सरकारच्या सल्ल्यानुसार सुरू आहे. हे काम संपताच विविध पंचायतींसाठी आरक्षण प्रभागांसाठी अधिसूचना काढण्यात येईल. ही निवडणूक 186 पंचायती तसेच 3 पंचायतीच्या 17 प्रभागांसाठी होणार आहे. अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीयांना सरकारने यापूर्वीच पुरेसे आरक्षण देण्यात आलेले आहेत. त्यामुळे यावेळी नव्याने आरक्षण प्रभाग स्थापन केले जाणार आहेत, असे गुदिन्हो म्हणाले.

ही पंचायत निवडणूक पक्षपातळीवर होणार नाही. पंचायतीवर चांगले लोकप्रतिनिधी निवडून यावेत, तसेच ज्यांनी समाजात तसेच विकास कार्यात प्रामाणिकपणे उत्तम काम केले आहे, त्यांना संधी मिळावी असे मत मंत्री गुदिन्हो यांनी व्यक्त केले. पक्षपातळीवर ही निवडणूक होणार नसल्याने एकाच पक्षातील अनेक उमेदवार या निवडणुकीत आपले नशीब आजमावू शकतात. त्यामुळे पक्ष समित्यांना उमेदवारींची नावे घोषित करून कार्यकर्त्यांचा रोष ओढवून घेण्याची पाळी येणार नाही.

पंचायत निवडणुकीची तारीख 4 जून तात्पुरती ठरली असून त्याच्यावर शिक्कामोर्तब होऊन अधिसूचना काढल्यावर निवडणूक कार्यक्रम ठरेल असेही गुदिन्हो म्हणाले. पुढील आर्थिक वर्षात पंचायतींमधील विकासकामांसाठी अधिक निधी तसेच जिल्हा पंचायतींसाठी अधिक अधिकार देण्यात येणार आहेत. मोकळ्या जागेचे व्यवस्थापन करण्याचे काम पंचायत पातळीवर सिमित न ठेवता ते जिल्हा पंचायतीकडे स्थलांतर करण्याचा प्रस्ताव आहे, असे मत मंत्री माविन गुदिन्हो यांनी व्यक्त केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vegetable Prices Update: राज्यात फळभाज्यांचे दर भडकले, लसूण 320 रुपये किलो; सर्वसामान्यांना महागाईचे चटके

Holy Spirit Feast In Margao: होली स्पिरिट चर्चच्या फेस्ताची सुरवात; मडगाव पालिकेचे 35 लाख महसुलाचे लक्ष्य

Egg Prices Increased: गोव्यात मासळीपाठोपाठ आता बॉयलर अंड्यांचे भाव गगनाला भिडले; दरातील चढउतार सुरूच

Kushavati River: केपेतील ‘कुशावती’चे पाणी प्रदूषित; ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात!

Goa Crime News: भागीदारीसाठी गुंतवलेल्या पैशांमध्ये केली अफरातफर; कळंगुट पोलिसांनी सहाजणांविरुद्ध नोंदवला गुन्हा

SCROLL FOR NEXT