Doctor Manmohan Singh had gifted Goa with 'Intranet' service
Doctor Manmohan Singh had gifted Goa with 'Intranet' service 
गोवा

गोव्यात इंटरनेटला पर्याय म्हणून डॉ. मनमोहन सिंग यांनी 'इंट्रानेट' दिल होत...

दैनिक गोमंतक

पणजी: गोव्यासाठी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग (Dr. Manmohan Singh) यांनी भेट दिलेली व प्रत्येक पंचायतीच्या दारात पोहोचलेली ऑप्टिक फायबर (Optic Fiber) केबल प्रणालीवर चालणारी इंट्रानेट सेवा (Intranet Service) कार्यांवित केल्यास गोव्यातला इंटरनेट सेवेचा प्रश्न कायमचा सुटणार असल्याचे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत (Digambar Kamat) यांनी म्हटले आहे. (Doctor Manmohan Singh had gifted Goa with Intranet service)

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant)  यांना आता गोव्यातील मोबाईल टॉवर प्रणालीवर आधारीत इंटरनेट सेवेत (Internet Service) कसे अडथळे येतात, हे कळून आले हे एका अर्थी बरे झाले. आज जर माझ्या सरकारच्या कारकिर्दीत सुरू केलेली इंट्रानेट सुविधा भाजप सरकारने पूर्णपणे कार्यांवित केली असती तर आज चक्रीवादळ आल्यानंतरही ती अखंडितपणे चालू राहिली असती. इंट्रानेट सुविधेत सगळे केबल भूमिगत असल्याने वादळी वारे वा पावसाचा प्रभाव त्यावर पडत नाही, असे त्यांनी नमूद केले आहे.

आज मुख्यमंत्र्यानी इंट्रा सर्कल रोमिंग सुविधा उपलब्ध झाल्याचे सांगितल्यानंतरही इंटरनेट जोडणी मिळणे कठिणच होते. अनेक भागांत कोठल्यास सेवा पुरवठादाराचे कनेक्शन मिळत नव्हते याकडे कामत यांनी लक्ष वेधले. जर इंट्रानेट सुविधा प्रत्येक घरात पोहोचली तर ऑनलाईम शिक्षण प्रणालीला मजबुती मिळेल. गोवा एक आदर्श राज्य म्हणून पुढे येईल.
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa BJP: प्रतापसिंह राणे यांचा श्रीपादना पाठिंबा, मी संघाची विचारधारा स्वीकारली; विश्वजीत राणे

Goa Today's Top News : राणेंचा गौप्यस्फोट, लोकसभा, राजकारण, अपघात; राज्यातील ठळक बातम्या एका क्लिकवर

Workers March Goa: पोटावर लाथ मारणारे सरकार हवे कशाला? फार्मा कंपन्यांवरील एस्मा मागे घ्या; पणजीत कामगारांचा एल्गार

Zero Shadow Day: सावली गोमन्तकीयांची साथ सोडणार; राज्यात अनुभवता येणार झिरो शाडो

Goa News: गोव्यात वेश्याव्यवसायिक 12 महिलांना मिळाला मतदानाचा अधिकार

SCROLL FOR NEXT