Decreased corona infection in the state of Goa
Decreased corona infection in the state of Goa 
गोवा

गोवा राज्यातील कोरोना संक्रमणात घट 

दैनिक गोमन्तक

पणजी : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. राज्यातील विविध आरोग्य केंद्रांच्या कार्यक्षेत्रात असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या गेली काही दिवसांपासून कमी होत असल्याने कोरोनाच्या संक्रमणात घट होतेय हे स्पष्ट आहे. राज्य आरोग्य सेवा संचालनालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मागील चोवीस तासांत दोघांचा मृत्यू झाल्याचे नोंद झाली असून, राज्यातील कोरोनाच्या बळींची संख्या ७४३ वर पोहोचली आहे.

मागील काही दिवसांत राज्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या घटत आहे. आज दिवसभरात राज्यभरात ८५१ एवढे रुग्ण असल्याचे नोंदले आहे. ता. १ जानेवारी रोजी ९३०, ता. २ रोजी ९२१ आणि ता. ३ रोजी ९०१ अशा रुग्णांची संख्या नोंदली गेली आहे. आज दिवसभरात १ हजार १७७ जणांचे नमुने  तपासण्यात आले. ४० ण पॉझिटिव्ह आढळले असून, ४७ जणांना घरगुती विलगीकरणात राहून उपचार घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर ३१ रुग्णांना उपचारासाठी दाखल करून घेण्यात आले आहे. मागील चोवीस तासांत २ जणांचा बळी गेला असून, एकूण बळींची संख्या ७४३ वर पोहोचली आहे. मृतांमध्ये डिचोली येथील ४३ वर्षीय पुरुषाचा तर कणकवली (सिंधुदुर्ग) येथील ५९ वर्षीय महिलेचा त्यात समावेश आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa BJP: प्रतापसिंह राणे यांचा श्रीपादना पाठिंबा, मी संघाची विचारधारा स्वीकारली; विश्वजीत राणे

Goa Today's Top News : राणेंचा गौप्यस्फोट, लोकसभा, राजकारण, अपघात; राज्यातील ठळक बातम्या एका क्लिकवर

Workers March Goa: पोटावर लाथ मारणारे सरकार हवे कशाला? फार्मा कंपन्यांवरील एस्मा मागे घ्या; पणजीत कामगारांचा एल्गार

Zero Shadow Day: सावली गोमन्तकीयांची साथ सोडणार; राज्यात अनुभवता येणार झिरो शाडो

Goa News: गोव्यात वेश्याव्यवसायिक 12 महिलांना मिळाला मतदानाचा अधिकार

SCROLL FOR NEXT