mapusa fish market
mapusa fish market 
गोवा

म्हापसा मासळी मार्केटात गर्दी

Dainik Gomantak

म्हापसा

म्हापसा नगरपालिकेने मासळी मार्केट ग्राहकांसाठी मर्यादित स्वरूपात खुले केल्यानंतर मासळी मार्केटच्या बाहेर मासळी कापण्यासाठी परवानगी दिली. पण मासळी कापण्यासाठी येणारे ग्राहक सामाजिक अंतर ठेवत नाही. त्यामुळे या भागात प्रचंड गर्दी प्रत्येक वेळी दृष्टीस पडत आहे. पण या लोकांवर कारवाई करण्यास पालिका असमर्थ ठरली आहे. सामाजिक अंतर व नियम न पाळणाऱ्यावर कारवाई करावी, अशी स्थानिकांची मागणी आहे.
कोरोना महामारीच्या काळात मासळी मार्केट, भाजी मार्केट तसेच पूर्ण बाजारपेठ ग्राहकांसाठी बंद करण्यात आली होती. त्यानंतर सरकारने कोरोनाच्या नियमात शिथिलता आणल्यामुळे म्हापसा नगरपालिकेने टप्याटप्याने बाजारपेठ ग्राहकांसाठी खुली केली. त्यानंतर मासळी मार्केट संघटनेच्या सहकार्याने ८० मासळी विक्रेत्यांच्या तुकडीने मासळी मार्केट ग्राहकांसाठी खुले केले. या मासळी विक्रेत्यांना सुद्धा सामाजिक अंतर ठेवून बसण्याची व्यवस्था केली गेली. या सर्व मासळी विक्रेत्यांनी मास्क लावणे बंधनकारक केले गेले. ही सर्व बंधने ८ दिवस चालली. पण कालांतराने ८० पेक्षा जास्त मासळी विक्रेत्या महिला बाजारात येऊन आपला व्यवसाय करु लागल्या. काही मासळी विक्रेत्या महिला तोंडाला मास्क सुद्धा लावत नाहीत. तसेच ग्राहक सुद्धा मास्क न लावता बाजारात मासळी खरेदी करण्यासाठी येतात. हे ग्राहक मासळी खरेदी केल्यानंतर मासळी कापण्यासाठी बाहेर केलेल्या व्यवस्थेकडे जातात. पहिल्या काही दिवसामध्ये मासळी कापणाऱ्यांची संख्या सुद्धा कमी होती. ही मंडळी सुरक्षित अंतर ठेवून मासळी कापत होते. नगरपालिकेच्या बाजार समितीचे सुद्धा या मासळी बाजाराकडे किंवा मासळी कापण्याच्या ठिकाणी पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. लोकांच्या मनामध्ये कोरोनाची भिती आहे. पण मासे बघितल्यानंतर मासे खरेदी करताना किंवा मासे कापण्यासाठी घेऊन जाताना सामाजिक अंतराचे भान राहात नाही. अशा लोकांवर कडक नजर ठेवण्यासाठी पालिकेने ठोस कृती योजना आखण्याची गरज आहे व या बाजारात लोकांना सुरक्षित मासे खरेदी करता यावे यासाठी पालिका निरीक्षकांना या ठिकाणी तैनात ठेवण्याची गरज आहे.
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa BJP: प्रतापसिंह राणे यांचा श्रीपादना पाठिंबा, मी संघाची विचारधारा स्वीकारली; विश्वजीत राणे

Goa Today's Top News : राणेंचा गौप्यस्फोट, लोकसभा, राजकारण, अपघात; राज्यातील ठळक बातम्या एका क्लिकवर

Workers March Goa: पोटावर लाथ मारणारे सरकार हवे कशाला? फार्मा कंपन्यांवरील एस्मा मागे घ्या; पणजीत कामगारांचा एल्गार

Zero Shadow Day: सावली गोमन्तकीयांची साथ सोडणार; राज्यात अनुभवता येणार झिरो शाडो

Goa News: गोव्यात वेश्याव्यवसायिक 12 महिलांना मिळाला मतदानाचा अधिकार

SCROLL FOR NEXT