COVID-19 GOA
COVID-19 GOA 
गोवा

Covid-19 Goa: 50 दिवसानंतर मृत्यूची संख्या एकअंकी; ‘कर्फ्यू’ उठण्याची शक्यता 

गोमंन्तक वृत्तसेवा

पणजी: राज्यात(Goa) गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या(Covid-19) मृत्यूचे व संसर्गाचे प्रमाण दिवसेंदिवस घटत आहे, ही दिलासादायक बाब आहे. गेल्या पावणदोन महिन्यांत आज कोरोनाग्रस्त मृत्यूचे(Death) प्रमाण एकअंकी पोहचले आहे. गेल्या चोवीस तासांत 8 जणांचा मृत्यू, तर 423 नवे संसर्ग नोंद झाले आहेत. हे प्रमाण बरेच कमी झाल्याने कोरोना संसर्ग नियंत्रणाखाली आणण्यात सरकारला यश आले.(Covid19 Two youths die of corona in Goa 423 newly infected)

काल शुक्रवारी ज्या आठ जणांचा मृत्यू झाला त्यातील 6 जणांचा गोमेकॉ इस्पितळात, दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळ तसेच उत्तर गोवा खासगी इस्पितळात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या दोघा जणांचे वय 28 वर्षे आहे.  राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची मृत्यूची संख्या ही 2899 वर पोहचली आहे. गोमेकॉ इस्पितळात कोरोना संसर्गासह सहव्याधी असलेल्या रुग्णांना दाखल करण्यात येत असल्याने ही संख्या नेहमीच इतर इस्पितळांपेक्षा अधिक असते मात्र गेल्या पावणेदोन महिन्यानंतर हे प्रमाण एकअंकीवर आले आहे. गेल्या चोवीस तासात 3599 व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी 423 जण संसर्गित आढळून आले आहेत.

‘कर्फ्यू’ उठण्याची शक्यता 
सर्वोच्च न्यायालयाने कोविडसंदर्भात घातलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार कोरोना संसर्गाचे प्रमाण 10 टक्क्यांपेक्षा अधिक असल्यास टाळेबंदी लागू करण्याची सूचना स्वेच्छा याचिकेत केलेली आहे. राज्यात सध्या राज्यस्तरीय कर्फ्यू गेल्या 9 मे पासून लागू आहे तो येत्या 14 जूनला 7 वा. संपणार आहे. सध्या कोविड पॉझिटिव्हिटी प्रमाणही 11.75 टक्क्यांवर आले आहे व पुढील काही दिवसांत ते आणखी खाली येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे राज्यातील कर्फ्यू उठविण्याची शक्यता अधिक आहे. 

लसीकरणकर्त्यांना सल्ला 
कोविड-19 लसची कुपी पात्र व्यक्तींना लसीकरणासाठी उघडल्यानंतर त्या दिवसाची तारीख व वेळ याची नोंद करण्यात यावी. या कुपीमधील लस ही 4 तासांमध्ये संपविण्यात यावी असा सल्ला केंद्र सरकारने लसीकरणकर्त्यांना दिला.

गेल्या 24 तासांतील कोरोना स्थिती 

  • बरे झालेले..............819
  • संक्रमणित रुग्ण.......423
  • इस्पितळातून घरी.....76
  • इस्पितळात दाखल....50

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa BJP: प्रतापसिंह राणे यांचा श्रीपादना पाठिंबा, मी संघाची विचारधारा स्वीकारली; विश्वजीत राणे

Goa Today's Top News : राणेंचा गौप्यस्फोट, लोकसभा, राजकारण, अपघात; राज्यातील ठळक बातम्या एका क्लिकवर

Workers March Goa: पोटावर लाथ मारणारे सरकार हवे कशाला? फार्मा कंपन्यांवरील एस्मा मागे घ्या; पणजीत कामगारांचा एल्गार

Zero Shadow Day: सावली गोमन्तकीयांची साथ सोडणार; राज्यात अनुभवता येणार झिरो शाडो

Goa News: गोव्यात वेश्याव्यवसायिक 12 महिलांना मिळाला मतदानाचा अधिकार

SCROLL FOR NEXT