कोविड मृतांची एकूण संख्‍या ८०
कोविड मृतांची एकूण संख्‍या ८० 
गोवा

आणखी ५ बळी

गोमंतक वृत्तसेवा

कोविड मृतांची एकूण संख्‍या ८०

पणजी:  राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या मृत्यूचे सत्र सुरूच आहे. सोमवारी राज्यात पाच कोविड संसर्ग झालेल्‍या रुग्णांचा मृत्यू झाला. त्‍यामुळे कोविड मृतांची एकूण संख्‍या ८० झाली आहे.

कोविड पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्याचे प्रमाणही वाढतेच असून गेल्या चोवीस तासात राज्यात ३१७ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले, तर २१३ रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. त्‍यामुळे २७४१ एवढे कोरोनाबाधित रुग्‍ण आहेत.

सोमवारी बळी गेलेल्‍यांत आके मडगाव येथील ४९ वर्षीय महिला, केपे येथील ७३ वर्षीय पुरुष, झुआरीनगर येथील ४७ वर्षीय पुरुष, इंदिरानगर चिंबल येथील ५५ वर्षीय पुरुष, माशेल फोंडा येथील ७४ वर्षीय महिलेचा समावेश आहे.

आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार आजच्या दिवशी हॉस्पिटल आयसोलेशनमध्ये ५७ जणांना ठेवण्यात आले. १२९७ जणांच्‍या लाळेचे नमुने घेण्यात आले, तर २२६५ जणांचे अहवाल हाती आहेत.

रेल्‍वे, विमान आणि रस्तामार्गे आलेले २ रुग्ण आहेत. डिचोलीत २५, साखळीत ८४, पेडणेत ६८, वाळपईत १०५, म्हापसा १०३, पणजीत १०३, बेतकी येथे २२, कांदोळीत ७७, कोलवाळ येथे ५४, खोर्लीत ७३, चिंबल येथे १३१, पर्वरीत ७१, कुडचडेत ४९,  काणकोणात २५, मडगावात २५४, वास्कोत ३८४, लोटलीत ४०, मेरशी येथे ३८, केपेत ६५, शिरोड्यात ४१, धारबांदोड्यात ८९, फोंडा येथे १७५, आणि नावेली आरोग्य केंद्रात ६० रुग्ण आणि राज्यात इतर ठिकाणीही रुग्ण आढळल्‍याची माहिती आरोग्य खात्याने दिली. 

पेडणे तालुक्यात १७ पॉझिटिव्ह 
पेडणे तालुक्यात विविध ठिकाणी आज १७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. त्यात मांद्रे येथे २, मोरजीत १, केरीत १, तुयेत १, विर्नोडा येथे १, धारगळ येथे ३, कोरगाव ४, मालपे ३, खाजने येथे १. खाजने येथील रुग्ण हा परप्रांतीय असून तो तिथे भाड्याच्या खोलीत राहात होता. आतापर्यंत पेडणे तालुक्यात ७८ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. त्यातील सुमारे ५५जण उपचार घेऊन घरी परतले.

आरोग्य मंत्र्यांच्या खासगी कार्यालयातील कर्मचाऱ्याला कोरोना
राज्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. आज राजधानीत १३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, त्यामुळे पणजीतील कोरोना पॉझिटिव्ह असणाऱ्यांची संख्या शंभरीपार १०३ वर गेली आहे.

विशेष बाब म्हणजे आरोग्य मंत्र्यांच्या मिरामार येथील खासगी कार्यालयात काम करणारी आणि रायबंदर येथे राहणारी महिला कर्मचारी पॉझिटिव्ह आढळली आहे. राजधानीतील वाढणारी रुग्णसंख्या ही चिंतेची बाब बनली आहे. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapuca Urban Bank: ''म्‍हापसा अर्बनच्‍या दयनीय स्‍थितीला पर्रीकरचं जबाबदार'', रमाकांत खलप यांचा सनसनाटी आरोप

Goa Drug Case: पिशवीत सापडला दोन लाखांचा गांजा; तिस्क उसगाव येथे तरुणाला अटक

Lok Sabha Election 2024: भाजपच्या मंत्रिमंडळातच बलात्कारी, मग महिलांना सुरक्षा कशी मिळणार? इंडिया अलायन्सच्या नेत्यांचा घणाघात

Goa Today's Live News Update: मी संघाची विचारधारा स्वीकारली आहे - मंत्री विश्वजीत राणे

Goa Cyber Crime: UAE च्या बँकेत नोकरीचे आमिष; चिंबलच्या तरुणीला मुलाखतीत कपडे काढण्यास सांगितले, गुन्हा नोंद

SCROLL FOR NEXT