covid-19 third wave.jpg
covid-19 third wave.jpg 
गोवा

Covid-19 Goa: तिसऱ्या लाटेत सहव्याधीग्रस्त मुलांना जास्त धोका               

दैनिक गोमंतक

कोरोनाने दुसऱ्या लाटेत तरुणांना विळखा घातल्यानंतर आता लहान मुले देखील या विषाणूचे लक्ष्य होत आहेत. तिसऱ्या लाटेत हे प्रमाणही वाढत असून, त्याचा परिणाम सहव्याधी असलेल्या मुलांवर होणार असून, नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी लहान मुलांचे लसीकरण करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी सरकारला दिला आहे.

राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगानेही याची दखल घेतली आहे. केंद्र, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील सरकारांनी कोणत्या उपाययोजना केल्या, याची माहिती मागवली आहे. तसेच देशातील 26 टक्के लोकसंख्या ही चौदा वर्षांखालील, तसेच सात टक्के लोकसंख्या ही पाच वर्षाखालील असल्याने, तज्ज्ञांकडून लहान मुलांच्या लसीकरणाचा सल्ला दिला जात आहे.

मुले अन्य व्याधींनी आजारी असूनही त्यांना कोरोनामुळे दवाखान्यात मोठ्या उपचारासाठी घेऊ जाणे कठीण झाले आहे. राज्याराज्यांतील लॉकडॉउन शिथिल झाले आणि मुले शाळेत जाऊ लागली, तर भीषण परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे शाळा सुरू होण्यापूर्वी लसीकरण पूर्ण करण्याची गरज दिल्लीतील बालरोगतज्ज्ञ डॉ. सिसिर पॉल यांनी व्यक्त केली आहे.

तिसऱ्या लाटेपासून राज्याला वाचवणार तज्ज्ञ डॉक्टरांची 'अ‍ॅक्शन कमिटी'

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा (Covid-19 Third Wave) सामना करण्यासाठी सरकारने सुयोग्य नियोजन करण्यास सुरवात केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या (Chief Minister) अध्यक्षतेखाली काल कृतिदल स्थापन केल्यानंतर आज तज्ज्ञ डॉक्टरांची (Doctor) कृती समितीही स्थापन केली आहे. कोरोनाची तिसरी लाट आलीच, तर राज्यातील 18 वर्षांखालील मुलांवर कोणत्या प्रकारे परिणाम होऊ शकतो, त्यासाठी मुलांची (Childrens) योग्य काळजी घेऊन त्यांच्यावर उपचार करण्यासाठी उपाययोजना आखण्यास प्रारंभ केला आहे. त्यादृष्टीने सरकारने गोवा  वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळाचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील डॉक्टरांची कृती समिती (Action Committee) स्थापन केली आहे. (committee of doctors was set up to save Goa from the third wave)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

Goa Today's Live News: चारशे नव्हे दोनशे पार देखील भाजपला जड जाणार - शशी थरुर

SCROLL FOR NEXT