monsoon goa.jpg
monsoon goa.jpg 
गोवा

Monsoon: गोव्यात आज आणि उद्या पावसाची शक्यता...  

दैनिक गोमंतक

पणजी: मान्सूनने सध्या अंदमान येथे हजेरी लावली आहे. मागील आठवड्यात राज्याला ‘तौक्ते’ वादळ (Cyclone Tauktae) आदळून गेले. यामुळे आज सत्तरी, धारबंदोडा आणि सांगे तालुक्यातील काही ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. राज्यात उद्या, परवा गडगडाटांसह पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तविली आहे. (Chance of rain in Goa today and tomorrow)

काही दिवसांपूर्वी राज्यात ‘तौक्ते’ वादळाने धडक दिली. त्याकाळात राज्याच्या कानाकोपऱ्याला पावसाने झोडपून काढले होते. वादळाचा प्रभाव अजूनही ओसरलेला नाही. त्यातच मान्सून अंदमान बेटावर पोचला आहे असून 31 मेपर्यंत तो केरळात धडकेल, असा हवामान वेधशाळेचा अंदाज आहे. 

जीवरक्षकांची नजर चुकवणं पडलं महागात; मोरजी समुद्रात बुडून मुलीचा मृत्यू
वादळामुळे मान्सून गोव्यात केव्हा येईल, याबाबत निश्चित काही सांगता येत नाही, असे शास्त्रज्ञ एम. राहुल यांचे मत आहे. हवामानातील अनपेक्षित बदलामुळे दररोज राज्यात काही ठिकाणी तुरळक पाऊस होत आहे. रविवारी संध्याकाळी, रात्री काही ठिकाणी पाऊस झाला.       

‘यास’ वादळचा परिणाम गोव्यात होणार नाही...

‘यास’ वादळ केवळ बंगालच्या उपसागराला आदळणार असून त्याचा कोणताही परिणाम गोव्यात (Goa) होणार नाही. मान्सून (Monsoon) अंदमानात आहे. केव्हाही ‘मान्सून’ केरळात येईल. त्यानंतरच गोव्यात केव्हा मान्सून येणार याची माहिती मिळेल. सध्या तरी मोठा धोका नाही, त्यामुळे लोकांनी काळजी करण्याची आवश्‍यकता नसल्याचे वेधशाळेचे शास्त्रज्ञ एम. राहुल यांनी सांगीतले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa BJP: प्रतापसिंह राणे यांचा श्रीपादना पाठिंबा, मी संघाची विचारधारा स्वीकारली; विश्वजीत राणे

Goa Today's Top News : राणेंचा गौप्यस्फोट, लोकसभा, राजकारण, अपघात; राज्यातील ठळक बातम्या एका क्लिकवर

Workers March Goa: पोटावर लाथ मारणारे सरकार हवे कशाला? फार्मा कंपन्यांवरील एस्मा मागे घ्या; पणजीत कामगारांचा एल्गार

Zero Shadow Day: सावली गोमन्तकीयांची साथ सोडणार; राज्यात अनुभवता येणार झिरो शाडो

Goa News: गोव्यात वेश्याव्यवसायिक 12 महिलांना मिळाला मतदानाचा अधिकार

SCROLL FOR NEXT