Toordal Wasted by Goa Government
Toordal Wasted by Goa Government Dainik Gomantak
गोवा

Toordal Scam in Goa : तूरडाळ प्रकरणात आणखी 6 जणांवर कारवाईचा बडगा

गोमन्तक डिजिटल टीम

Toordal Scam in Goa : 242 टन तुरडाळीच्या नासाडीप्रकरणी दक्षता खात्याने सादर केलेल्या अहवालानुसार माजी संचालक सिद्धिविनायक नाईक यांच्याव्यतिरिक्त आणखी सहाजणांचा समावेश आहे. या सर्वांविरुद्ध कडक कारवाई करण्याचा आदेश दिला आहे. साखर नासाडी प्रकरणाची जबाबदारी निश्‍चित करण्यासाठी फाईल दक्षता खात्याकडे पाठवण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

दक्षता खात्याने या नासाडी झालेल्या तूरडाळप्रकरणी तत्कालीन संचालक सिद्धिविनायक नाईक हे एकटेच जबाबदार नसून त्यामध्ये आणखी सहा कर्मचारी गुंतलेले आहेत असा निष्कर्ष या प्रकरणाची चौकशी केलेल्या आयपीएस अधिकारी वाय. व्ही. व्ही. राजशेखर यांनी काढून अहवाल मुख्यमंत्र्यांकडे पुढील निर्णयासाठी पाठविला होता. या कर्मचाऱ्यांमध्ये खात्याचे उपसंचालक स्तरावरील अधिकारी, निरीक्षक, लिपिक अशा विविध पदावरील कर्मचारी जबाबदार आहेत.

या तुरडाळीच्या पुरवठ्याची फाईल ज्या कर्मचाऱ्यांनी हाताळली आहे त्यांनी ती नासाडी होईपर्यंत कोणतीच पावले उचलली नाहीत. तुरडाळीची नासाडी झाल्यानंतर त्याच्या लिलावासाठी फाईल संचालकांकडे पाठवण्यात आली. तूरडाळीचे झालेले कोट्यवधींचे नुकसान याचा कोणताही विचार न करता त्याचा लिलाव करण्यासाठी जाहिरात देण्यात आली. यावरून या खात्यातील कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा व निष्काळजीपणा उघड होत असल्याने कारवाईची शिफारस राजशेखर यांनी केली होती.

242 टन तूरडाळ, 10 टन साखर खराब

राज्यात कोविड काळात लोकांना स्वस्त धान्य दुकानातून डाळींचे वितरण करण्यासाठी केंद्राकडून 79 रुपये प्रति किलो दराने 408 टन तूरडाळ खरेदी केली होती व त्यासाठी सुमारे 322 कोटी रुपये खर्च केले होते. यापैकी 166 टन तूरडाळ नागरी पुरवठा खात्यातर्फे वितरित करण्यात आली व उर्वरित 242 टन तूरडाळीचा वापर करण्याबाबत काहीच पावले उचलण्यात आली नाहीत. गोदामात ही तूरडाळ पडून राहिल्याने तिची नासाडी झाली. ही डाळ मोफत जरी स्वस्त धान्य दुकानांवर दिली असती तर त्याची गोरगरिबांना त्याची मदत झाली असती मात्र खात्याच्या कर्मचाऱ्यांच्या बेफिकीरपणामुळे 242 टन तूरडाळ तसेच 10 टन साखरही खराब झाली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Konkan Railway Fine Collection: फुकट्यांना कोकण रेल्वेचा दणका, एप्रिलमध्ये 2.70 कोटी दंड वसूल

Goa Crime: रस्ता अडविणे, दंगल माजविणे याप्रकरणी कुंकळ्ळीत 400 भाविकांविरोधात गुन्हा

Defamatory Post Lairai Devi: अन्यथा अस्नोडा जंक्शन रोखणार! भाविकांची म्हापसा पोलिस स्थानकावर धडक

Madgaon Station News: कोकण रेल्वेची मडगाव येथे रेंट अ बाईक सुविधा; विजय सरदेसाईंचा कडाडून विरोध, आंदोलनाचा इशारा

आम्ही गप्प बसू शकत नाही...अल्पवयीन मुलीच्या गर्भपातास कोर्टाची परवानगी

SCROLL FOR NEXT