Truck accident
Truck accident 
गोवा

मालपे जंक्शनजवळ रेतीवाहू ट्रकला अपघात

Dainik Gomantak

पेडणे

सविस्तर माहितीनुसार, दामोदर ट्रान्सपोर्टचा जीए - ०४ - टी - २६६६ क्रमांकाचा ट्रक पणजीहून भालखाजन - कोरगाव येथे रेती नेण्यासाठी येत होता. मालपे येथील जंक्शनवर पोहचल्यावर ट्रकचालकाचा ताबा गेल्याने ट्रक वरून सुमारे सात फूट खाली पडला व त्यात हरपाल सिंग (वय २८) हा मूळ पंजाब व सध्या पणजी येथे राहाणारा चालक अडकून पडला.
यावेळी घटनास्थळी असलेले पेडणे अग्निशमन दलाचे जवान विष्णुदत्त परब यांनी ही माहिती पेडणे अग्निशमन दलाला कळविल्यावर पेडणे अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहचले व त्यांनी चालकाला सुरक्षितरीत्या बाहेर काढले व रुग्णवाहिकेला माहिती देवून उपचारासाठी इस्पितळात पाठविले. पेडणे अग्निशमन दलाचे उपअधिकारी प्रशांत धारगळकर, चालक रामदास परब, जवान विशाल पाटील, रतन परब, संदेश पेडणेकर व विष्णुदत्त परब यांनी भाग घेतला. पेडणे पोलिस ठाण्यातील हवालदार रतन साळगावकर यांनी अपघाताचा पंचनामा केला.

Goa Goa Goa Goa

 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : सावर्डेतून भाजपला मिळवून देणार २० हजार मताधिक्‍य; भाजप मंडळाची ग्‍वाही

Panaji News : विरोधकांनी स्वप्नेच पहावी! बाबूश मोन्सेरात

Congress News : काँग्रेसच्या दिग्गजांची पाठ; विराट सभांना फाटा

Panaji News : पणजीत पोर्तुगीजकालीन नाल्यांची सफाई

Goa Dam : पावसाळ्यापर्यंत राज्यात पाणीटंचाईची शक्यता नाही; धरणांमध्ये पुरेसा जलसाठा

SCROLL FOR NEXT