नवरात्रोत्सवातील सहभागानंतर घरी परतणाऱ्या मायलेकाला भीषण अपघात होऊन मातेचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर पुत्र गंभीर जखमी होण्याचा प्रकार गुरुवारी ( 3 ऑक्टोबर) कोने-प्रियोळ येथे घडला.
जीए ०५ - ई - ९५०१ या क्रमांकाच्या दुचाकीने म्हार्दोळहून कुर्टी - फोंडा येथे परतणाऱ्या पाध्ये कुटुंबातील मायलेकाला त्याच दिशेने येणाऱ्या जीए ११ - टी - ०२५५ या क्रमांकाच्या ट्रकची दुचाकीला मागून धडक बसली.
या अपघातात दुचाकीखाली कोसळली व दुचाकीवरील अनुराधा दतात्रय पाध्ये (वय ६२) ही रस्त्यावर फेकली गेली आणि नेमकी ट्रकच्या खाली सापडल्याने जागीच ठार झाली, तर तिचा पुत्र दुचाकीचालक योगेश दत्तात्रय पाध्ये (वय ३७) हा रस्त्याच्या बाहेर फेकल्याने गंभीर जखमी झाला. म्हार्दोळ पोलिसांनी अपघाताला कारणीभूत ठरलेल्या भगवान भोसले (वय ३८) या खांडेपार येथे राहणाऱ्या ट्रकचालकाला ताब्यात घेतले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.