Goa Accident Death
Goa Accident Death Dainik Gomantak
गोवा

राज्यात एकूण 39 अपघातप्रवण क्षेत्रे..!

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यातील रस्त्यांवर एकाच भागात वारंवार घडणाऱ्या अपघातांचा अहवाल वाहतूक पोलिस विभागाने तयार केला आहे. राज्यात मृत्यूचे सापळे असलेली 39 अपघातप्रवण क्षेत्रे असून त्यात उत्तरेत 15 तर दक्षिणेत 24 क्षेत्रांचा समावेश आहे. या ठिकाणांची सुधारणा करण्यास पोलिसांनी सार्वजनिक बांधकाम खात्याला वारंवार पत्रे पाठवलीत. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने ही ठिकाणे धोकादायक बनत आहेत.

(A total of 39 accident prone areas in the state)

सर्वाधिक अपघाताचे प्रमाण हे जुने गोवे कदंब पठार, पर्वरी दामियान दी गोवा, जुना मांडवी पूल, फर्मागुडी, फोंडा सोमनाथ मंदिराजवळ व मडगाव जुने मार्केट आहेत. या ठिकाणी सरासरी ३० पेक्षा अपघात झाले आहेत. हा अहवाल गेल्या तीन वर्षात घडलेल्या अपघातांचा आधारे ५०० मी. अंतराचे प्रमाण घेऊन तयार करण्यात आला आहे. काही ठिकाणी असलेली वळणे व अरुंद रस्ता हे अपघाताचे कारण ठरले आहे. यात सुधारणा करण्यासाठी दरवर्षी पीडल्ब्यूडी खात्याच्या महामार्ग, रस्ते व पूल या विभागाला वेळोवेळी पत्र पाठवली जातात. सुधारणेसाठी पोलिस खात्याकडे निधी नसतो. त्यामुळे पीडब्ल्यूडी खात्याला ते काम करण्यासाठी कळविले जाते. त्यांच्याकडून किरकोळ सुधारणा होते. परंतू जादा निधीची आवश्‍यकता असल्याने ती कामे रखडली आहेत.

वाहतूक पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर गोव्यात १५ अपघातप्रवण क्षेत्रे आहेत. वारंवार घडणाऱ्या अपघाताच्या आधारे हा भाग अपघातास धोकादायक म्हणून निवडला गेला आहे. यामध्ये पणजीतील दिवजा सर्कल (२३ अपघात), कदंब पठार येथील साईबाबा मंदिर (४०), कळंगुट येथील पालमारिना रिसॉर्टजवळ (१८) व डॉल्फिन सर्कल (२३), कळंगुट येथील प्रभूवाडा (१७), म्हापसा येथील ग्रीन पार्क जंक्शन (३२ अपघात), बिनानी कोलवाळ (१६), साळगाव जंक्शन (८), पर्वरी दामियान दी गोवा (४९), जुना मांडवी पूल सर्कल (४९), ओशेलबाग धारगळ (२१), पेडणेतील तोर्से येथे (७), डिचोलीतील आयटीआय येथे (२०) , विठ्ठलापूर - साखळी (१२) व झांट्ये महाविद्यालजवळ (११) यांचा समावेश आहे.

दक्षिण गोव्यात २४ अपघातप्रवण क्षेत्रे आहेत त्यामध्ये प्रियोळ ते फर्मागुडी (३४ अपघात), बोरी सर्कल ते पूल (१५ अपघात), अमेय वाडा - खांडोळा ते माशेल बसथांबा (८), फोंडा येथील सोमनाथ मंदिरजवळ (२४), कुंडई आयडीसी (२४), फोंडा जीव्हीएम महाविद्यालय (१७), धारबांदोडा साखर कारखाना (८) व धारबांदोडा (१४), उसगाव फोंडा (२२), भोमा - फोंडा (१५), बाणावली विन्सेट बार अँड रेस्टॉंजवळ (१४), कोलवा मोंतिओ जंक्शन (२३) व मारिया सभागृह जंक्शन (१२), केपे मार्लेक्स बारजवळ (१७), वास्को सेंट अँड्रू चर्चजवळ (२१), शांतिनगर जंक्शन (१९), फातोर्डा हॉटेल ऑदेत जंक्शन (२५), होली स्पिरिट चर्चजवळ (१३), मडगाव जुने मार्केट सर्कल (२३), फातोर्डा बीडब्ल्यूडीजवळ (४७), दवर्ली जिल्हा इस्पितळजवळ (२३), घोगळ भोसले सर्कल (३३) व फातोर्डा जंक्शन (३३) याचा समावेश आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News: गोव्यात वेश्याव्यवसायिक 12 महिलांना मिळाला मतदानाचा अधिकार

Goa Today's Live News Update: शापूर फोंडा येथे दुचाकींचा अपघात, दोघे जखमी

Mapusa Urban Bank: ''म्‍हापसा अर्बनच्‍या दयनीय स्‍थितीला पर्रीकरचं जबाबदार'', रमाकांत खलप यांचा सनसनाटी आरोप

Goa Drug Case: पिशवीत सापडला दोन लाखांचा गांजा; तिस्क उसगाव येथे तरुणाला अटक

Lok Sabha Election 2024: भाजपच्या मंत्रिमंडळातच बलात्कारी, मग महिलांना सुरक्षा कशी मिळणार? इंडिया अलायन्सच्या नेत्यांचा घणाघात

SCROLL FOR NEXT