Mapusa Assault Case Dainik Gomantak
गोवा

Mapusa Assault Case: म्हापसा प्राणघातक हल्ल्याप्रकरणी 9 जणांना अटक; पोलिसांची मोठी कारवाई

Manish Jadhav

राज्यात गेल्या काही दिवसांपासून म्हापसा प्राणघातक हल्ला प्रकरण चांगलंच गाजत आहे. यातच आता, या प्रकरणात म्हापसा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. रामकृष्ण उर्फ आरके भालेकर, मंथन चारी, श्रीधर किल्लेदार, अभिषेक पुजारी, शरणबसू गायकवाड, नागराज पुजारी आणि बोरेश पुजारी यांच्यासह एकूण नऊ जणांना म्हापसा पोलिसांनी अटक केली. हे प्रकरण "देवडी केस" म्हणून ओळखले जाते.

दरम्यान, आरोपींना या प्रकरणातील प्रमुख व्यक्ती संदेश साळकर यांच्यासह पीडितेच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत न्यायालयात हजर करण्यात आले. या हल्ल्यातील सर्व आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात यावी, अशी मागणी देवडी कुटुंबीयांनी केली आहे.

देवडी खून प्रकरणात क्राईम ब्रांचच्या सहाय्याने म्हापसा पोलिसांकडून संशयित नारायण उर्फ बाबू भालेकर आणि मुटप्पा उर्फ सनी निकोडे यांना सावंतवाडीमधून अटक करण्यात आले होते. पोलिसांनी संशयितांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. पोलिसांनी याप्रकरणात आतापर्यंत नऊ जणांना अटक केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

St. Francis Xavier DNA Test Row: ''वेलिंगकरांना अटक केल्यास...''; हिंदू संघटनांचा इशारा

Israel-Iran War Impact: तणाव इराण-इस्त्रायलमध्ये, झळ भारताला; तेलाच्या सर्वात मोठ्या आयातदाराची वाढली चिंता!

Subhash Velingkar Case: सुभाष वेलिंगकरांना अटक करा!! आता थेट परदेशातून आंदोलकांची मागणी

Debt Crisis: जगातील 'हे' 7 देश दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर, तीन देश तर भारताचे शेजारी!

गोव्यात खाजगी क्षेत्राची उपेक्षाच! प्रत्येकाला सरकारी नोकरी कुठून देणार? बेरोजगारीची समस्या कशी सोडवणार?

SCROLL FOR NEXT