Panaji Traffic | Merces | AI Traffic Management System
Panaji Traffic | Merces | AI Traffic Management System  Dainik Gomantak
गोवा

Panaji Traffic: मेरशी जंक्शन येथे पहिल्याच दिवशी 422 जणांकडून वाहतूक नियमांचा भंग

गोमंतक ऑनलाईन टीम

Panaji Traffic: गोव्यातील ट्रॅफिकवर कृत्रिम बुद्धिमत्तेचा कंट्रोल राहणार आहे. एआय सिस्टिमचा वापर करून वाहतूक नियंत्रित केली जात आहे. तसेच यातून वाहतूक नियमांचा भंग करणारेही टिपले जात आहेत.

राज्यात आज, एक जून पासून वाहतूक नियमांची कडक अंमलबजावणी सुरू झाली आहे. पणजीतील मेरशी जंक्शन येथे पहिल्याच दिवशी 422 जणांनी नियमभंग केल्याचे समजते.

यातील बहुतांश लोकांनी कारमध्ये सीटबेल्ट वापरलेला नव्हता. तर अनेक दुचाकीस्वारांनी हेलमेट परिधान केलेले नव्हते.

सीटबेल्ट व्हायोलेशनचे एकूण 315 प्रकार समोर आले आहेत. तर जवळपास 95 जणांनी दुचाकी चालवताना हेलमेट परिधान केलेले नव्हते. 7 दुचाकींवर दोनपेक्षा अधिक जणांनी प्रवास केला आहे.

5 जण ड्रायव्हिंग करताना मोबाईलवर बोलताना आढळून आले आहेत. या सर्वांना एआय सिस्टिमद्वारे थेट घरी चलन पाठवले जाणार आहे.

दरम्यान, परिवहन मंत्री माविन गुदिन्हो यांच्या हस्ते 10 पोर्टेबल स्पीड रडार गन ट्रॅफिक विभागाकडे सुपूर्द करण्यात आल्या आहेत. याद्वारे वाहनांचे स्पीड मोजता येते. त्यातून ओव्हरस्पीड असलेल्या वाहनांवर कारवाई करता येते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Session Court: वेश्याव्यवसाय प्रकरणी दोषी ठरलेल्या विजय सिंग याला गुरुवारी ठोठावली जाणार शिक्षा

Canacona: तपासणी टाळण्यासाठी समुद्रातून मद्य तस्करी; काणकोण येथे एकाला अटक

Goa SSC Result Declared: यंदाही मुलीच हुश्शार, गोव्यात दहावीचा 92.38 टक्के निकाल

Xeldem Assault Case: आंब्यावरुन मारहाण, सोनफातर - शेल्‍डे येथे बागमालकास जीवे मारण्याची धमकी

Goa Today's Top News: दहावीचा निकाल, अपघात, चिरे खाणीवर छापा; गोव्यातील बातम्यांचा आढावा

SCROLL FOR NEXT