Rajyabhishek Din celebrated at Farmagudi
Rajyabhishek Din celebrated at Farmagudi Dainik Gomantak
गोवा

Shivrajyabhishek Din 2023 : फर्मागुढीत तीन मंत्र्यांची उपस्थिती; मान्यवरांकडून शिवरायांना पुष्पांजली

दैनिक गोमन्तक डिजिटल

फर्मागुढी-फोंड्यातील किल्ल्यावर छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या स्मृती जागवण्यात आल्या. मंगळवारी शिवराज्याभिषेकदिनानििमत्त आयोजित कार्यक्रमाला फोंडा, मडकई व प्रियोळ अशा तिन्ही मतदारसंघातील मंत्री तसेच जिल्हा पंचायत सदस्य, पंचायत सदस्य, सरकारी अधिकारी आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांनी यावेळी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केले.

फर्मागुढी येथे सकाळी कृषिमंत्री रवी नाईक, वीजमंत्री सुदिन ढवळीकर व कला संस्कृतीमंत्री गोविंद गावडे तसेच जिल्हा पंचायत सदस्य गणपत नाईक, बांदोडा सरपंच सुखानंद कुर्पासकर इतर पंचायतींचे सरपंच, उपसरपंच, पंचसदस्य व शिवप्रेमींनी उपस्थिती लावून शिवाजी महाराजांना पुष्पांजली अर्पण केली. यावेळी फोंड्याचे उपजिल्हाधिकारी रघुराज फळदेसाई, मामलेदार आणि इतर कर्मचारी उपस्थित होते.

शिवरायांचा आदर्श ठेवा

छत्रपती शिवाजी महाराज हे दूरदृष्टी बाळगणारे नेते होते, म्हणूनच त्यांनी स्वराज्याची स्थापना केली आणि रयतेला सुराज्य प्रदान केले. शिवाजी महाराजांचे नियोजन आणि आयोजन नेटके होते, त्यामुळेच तर मुघलांना पळता भुई थोडी झाली. शिवरायांचा हा आदर्श आजच्या युवा पिढीने बाळगायला हवा, असे कृषिमंत्री रवी नाईक यांनी सांगितले.

संघटितपणे कार्य करायला हवे

छत्रपती शिवाजी महाराज यांनी आदर्श राज्य निर्माण करून इतरांसाठी एक उदाहरण ठेवले. रयतेला सुराज्य प्रदान करताना स्वत्वाची जाणीव त्यांनी त्याकाळी मावळ्यात निर्माण केली, म्हणूनच तर स्वराज्याची निर्मिती झाली.

आजच्या काळात सुराज्य निर्माण करण्यासाठी सर्वांनी संघटितपणे कार्य करायला हवे, असे मत वीजमंत्री ढवळीकर यांनी व्यक्त केले.

छत्रपती शिवाजी महाराज आदर्श नेते

छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श नेते होते. स्वराज्य निर्माण करताना त्यांनी सर्वांना सोबत घेऊन कार्य केले. सुराज्याची संकल्पना दृढ करण्यासाठी मावळ्यांची साथ घेऊन महाराजांनी मुघलांशी टक्कर दिली.

प्रत्येक घरात शिवाजी निर्माण होण्याबरोबरच माता जिजाऊही तयार व्हायला हव्यात तरच आज सुराज्याची निर्मिती करणे शक्य होईल, अशी माहिती गोविंद गावडे यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

Goa Today's Live News: चारशे नव्हे दोनशे पार देखील भाजपला जड जाणार - शशी थरुर

United Nations मध्ये भारताचा अमेरिका आणि इस्रायलला दणका; स्वतंत्र पॅलेस्टाईनच्या मागणीला दिला पाठिंबा

SCROLL FOR NEXT